आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश भट्ट यांना खंडणीसाठी फोन, आलियाला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री आलिया भटला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.  उत्तर प्रदेश पोलिस एसटीएफ आणि मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. संदीप साहू (24) असे आरोपीचे नाव आहे. त्याने महेश भट यांना फोनवरुन आणि व्हॉट्सअॅप कॉल करुन धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी फोनद्वारे धमकी ‍मिळाली होती.  आलिया भट्ट हिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी महेश भट्ट यांन जुहू पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

सुरुवातीला फोनवर महेश भट्ट यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. भट्ट यांनी सुरुवातीला कोणीतरी गंमत करत असेल असे समजून दुर्लक्ष केले. पण नंतर त्यांना व्हॉट्स अॅपवर मॅसेज करून पुन्हा धमकी दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. हा प्रकार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस घडला असल्याची माहितीही मिळाली आहे. आलियाच्या आई सोनी यांनादेखिल मारण्याची धमकी देण्यात आली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...