आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते महिमा, बॉयफ्रेंडने दिला होता दगा, लग्नापूर्वीच झाली होती प्रेग्नेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आगामी ‘डार्क चॉकलेट’ या बंगाली थ्रिलर सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी इंद्राणी मुखर्जीची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडावर आधारित आहे. सिनेमाच्या प्रमोशनवेळी महिमा चौधरीने खुलासा केला, की लिएंडर पेसकडून तिला प्रेमात दगा मिळाला होता. लिएंडर एक उत्कृष्ट टेनिस प्लेअर आहे, मात्र व्यक्ती म्हणून चांगली नाही. मला जेव्हा कळलं, की त्याच्या आयुष्यात दुसरं कुणी आलंय, तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही. उलट मी पूर्वीपेक्षा आता जास्त मॅच्युअर झाली आहे, असे महिमा म्हणाली.

जाणून घ्या लिएंडरविषयी आणखी काय म्हणाली महिमा...
महिमाने सांगितले, लिएंडरने जे माझ्याबाबतीत केले, तो आता त्याची पत्नी रिया पिल्लईसोबतसुद्धा तसंच करणारेय. महिमा चौधरीने २००६ मध्ये मुंबईतील आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले आणि लग्नाच्या काही महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, असे म्हटले जाते. २०१३ मध्ये बॉबी आणि महिमा विभक्त झाले. महिमा सिंगल मदर असून मुलगी अरियानीचे संगोपन एकटीच करत आहे. मुलीचा एकट्याने सांभाळ करत असल्याने सिनेसृष्टीत लवकर कमबॅक करु शकली नसल्याचे, महिमाने सांगितले. त्याकाळात टीव्ही शोची परीक्षक आणि शो-रुमचे रिबन कापण्यासारखी कामे केली, जी माझ्यासाठी सोयीची होती, असे तिने यावेळी सांगितले.

दुस-या लग्नाचा विचार केल्यानंतर घेणारेय घटस्फोट
महिमाने सांगितले, की तिने अद्याप बॉबी मुखर्जीकडून कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेला नाही. याचे कारण म्हणजे सध्या तिच्याकडे या गोष्टींसाठी वेळ नाहीये. दुस-या लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर घटस्फोटाकडे लक्ष देणार असल्याचे ती म्हणाली.
बॉबी मुखर्जीसोबत लग्नापूर्वी महिमा चौधरी टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये होती. १९९७ साली शाहरुख खान स्टारर 'परदेस' या सिनेमाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. काही निवडक सिनेमे केल्यानंतर २००६ मध्ये तिने फिल्म इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला होता.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, महिमा चौधरीची निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...