आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बिग बॉस\'मध्ये सपनाने \'भाभीजी\'ला दिली औकात दाखवण्याची धमकी, हे झाले नॉमिनेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसमध्ये शिल्पा शिंदे आणि सपना चौधरी यांच्यात भांडण झाले तेव्हा. - Divya Marathi
बिग बॉसमध्ये शिल्पा शिंदे आणि सपना चौधरी यांच्यात भांडण झाले तेव्हा.

मुंबई - 'बिग बॉस-11' मध्ये भाभीजी अर्थात शिल्पा शिंदे आणि सपना चौधरी यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. झाले असे, की आकाश ददलानी बेडरुम एरियात आला आणि त्याने सपनाला सांगितले, की शिल्पा तुझ्याबद्दल फार वाईट-वाईट बोलत आहे. 'सपनाला तिची औकात दाखवली पाहिजे' असे चिथावणीच्या भाषेत त्याने सांगितले. हे सर्व ऐकल्यानंतर बिग बॉसच्या घरात भडका उडणार नाही, असे कसे होईल. सपनानेही मग सर्वांची औकात काढण्याची भाषा केली.

 

अर्शीवरुन झाले सपना-शिल्पामध्ये तू-तू, मैं-मैं 
- आकाशने चिथावणी दिल्यानंतर सपना किचन एरियामध्ये येते, येथे तिचे शिल्पासोबत जोरदार भांडण होते. 
- तेवढ्यात आकाश म्हणतो, की शिल्पाने हेही म्हटले होते की जर सपनाने अर्शीबद्दल एक शब्दही वाईट काढला तर तिला सोडणार नाही. 
- हे ऐकल्यानंतर सपना आणखी भडकते आणि अर्शीला फरेबी, मक्कार म्हणते. 
- सपनाच्या वक्तव्याला शिल्पाही तोडीस तोड उत्तर देते. ती म्हणते, तिचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. 

हे कंटेस्टंट झाले नॉमिनेट 
- गार्डनमध्ये सेफ झोन तयार करुन बिग बॉसने नॉमिनेशन टास्क दिला. 
- या एरियात 4 कंटेस्टंट हिना खान, विकास गुप्ता, हितेन तेजवानी आणि अर्शी खान यांना बसायचे होते. सहावेळा एक ट्यून वाजल्यानंतर या सर्वांना एकमेकांसोबत एक्सचेंज व्हायचे होते. 
- असे करताना हिनाने प्रियंक शर्मा, सपनाने सर्वांसोबत अदला-बदली करत शेवटी लव त्यागीला सेफ केले. 
- त्यासोबतच सर्वात शेवटी लवशिवाय हितेन तेजवानी, विकास गुप्ता, अर्शी खान हे या आठवड्याच्या नॉमिनेशनमधून सेफ राहिले. 
- टास्कनंतर 'बिग बॉस'ने अनाऊन्समेंट करुन सांगितले, की या आठवड्यात हिना खान, सपना चौधरी आणि प्रियंक शर्मा, आकाश ददलानी, शिल्पा शिंदे आणि पुनीष शर्मा एविक्शनसाठी नॉमिनेटेड झाले आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बिग बॉसच्या घरात सपना-शिल्पाचा राडा... 

बातम्या आणखी आहेत...