आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहीच्या बायोपिकच्या बजेटला लावली कात्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(धोनीवर आधारित सिनेमाचे पोस्टर)

कोणीही गॉडफादर नसताना रांचीसारख्या छोट्या शहरातून येत भारतीय किक्रेट संघाच्या कॅप्टनशिपचा काटेरी मुकुट वर्षे यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या नावावर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रेकॉर्ड नोंदविले गेले आहे. सध्या महेंद्रसिंग धोनी या नावाची इंडस्टीमध्येदेखील जोरदार चर्चा आहे. कारण सुशांत सिंह राजपूतच्या प्रमुख भूमिकेमध्ये धोनीच्या बायोपिकचे काम प्रगतिपथावर चालू आहे. मात्र सध्या या चित्रपटाच्या बजेटमध्ये कपात करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
सुशांतच्या मागील 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'ची समीक्षकांची भरपूर प्रशंसा केली. मात्र बॉक्स ऑफिसवर सुशांतचा डिटेक्टिव्ह कमाल करू शकला नाही. त्यामुळे निर्मात्यांना या चित्रपटाच्या व्यवसायाबद्दलदेखील चिंता आहे. दुसरीकडे 'एम.एस.धोनी : अनटोल्ड स्टोरी'च्या निर्मात्यांनी या चित्रपटातून आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये म्हणून चित्रपटाच्या बजेटमध्येच कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे.