आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Making Of PULI Sridevi Fights Using 7 Kilo Sword Wearing 10 Kilo Outfit

10 kg चा ड्रेस, 7 kg ची तलवार, 25 cr चा महाल: असे झाले श्रीदेवीच्या 'पुली'चे शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः श्रीदेवी - Divya Marathi
फाइल फोटोः श्रीदेवी

एन्टरटेन्मेंट डेस्कः 'बाहुबली'च्या सुपरडुपल सक्सेसनंतर आता लोकांचे लक्ष लागेल आहे ते दक्षिणेच्या आणखी एका सिनेमाकडे. हा आगामी सिनेमा दिग्दर्शक चिंबु देवेन यांचा 'पुली' आहे. सिनेमात आकर्षणाचे केंद्रबिंदू अभिनेत्री श्रीदेवी आहे. 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'इंग्लिश विंग्लिश'नंतर तब्बल तीन वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.
120 कोटींचे बजेट असलेल्या या फँटसी अॅडव्हेंचर सिनेमात श्रीदेवीने एका राणीची भूमिका वठवली आहे. सिनेमाचे शूटिंग फॉरेन लोकेशन्स आणि महागड्या सेट्सवर झाले आहे.
divyamarathi.com सोबत बातचित करताना सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर नटराजन सुब्रमण्यम यांनी सिनेमातील अनेक अननोक फॅक्ट्स आणि बिहाइंड द सीन सिक्रेट्स शेअर केले.
श्रीदेवीने परिधान केला 10 किलो वजनी ड्रेस
'पुली' या सिनेमात अनेक शतकांपूर्वीच्या एका जुन्या राज्याची कहाणी आहे. यामध्ये श्रीदेवीने राणीची भूमिका वठवली आहे. त्यामुळे सिनेमात तिने जड वजनी ड्रेसेस परिधान केले आहेत. रंजक बाब म्हणजे हे सर्व कॉश्च्युम्स प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले आहेत. श्रीदेवीच्या प्रत्येक कॉश्च्युमचे वजन जवळजवळ 10 किलो इतके आहे. नटराजन सांगतात, श्रीदेवीला तयार करण्यासाठी मेकअप टीमला दररोज चार तासांचा अवधी लागायचा. जर शुटिंग सकाळी नऊ वाजता सुरु होणार असेल, तर त्यासाठी श्रीदेवीला सकाळी 5 वाजता सेटवर हजर व्हावे लागायचे.
दिग्दर्शक चिंबु देवेन यांचा हा सिनेमा येत्या 1 ऑक्टोबर रोजी रिलीज होणारेय. सिनेमात श्रीदेवीसह साउथचा सुपरस्टार विजय, श्रुती हासन आणि हंसिका मोटवानी मेन लीडमध्ये आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सिनेमाशी निगडीत आणखी काही रंजक गोष्टी...