आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे झाले 2.0 चे शुटिंग, अक्षय-रजनी यांची केमिस्ट्री, तंत्रज्ञान पाहून व्हाल थक्क.. पाहा Making

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रजनिकांतच्या आगामी 2.0 या चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी या चित्रपटाचा मेकिंग व्हिडीओ ट्विटरवर शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये रजनिकांत आणि अक्षय कुमार चांगल्या मूडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'रोबोट' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाची शुटिंग डायरेक्टर शंकर यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू केली होती. आधी हा चित्रपट यावर्षी दिवाळीला रिलीज होणार होता. पण आता तो 2018 मध्ये रिलीज होणार आहे. सध्या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. 

400 कोटींचे बजेट 
माहितीनुसार 400 कोटींच्या बजेटमध्ये बनणारा हा चित्रपट आतापर्यंचतचा सर्वात महागडा आशियायी चित्रपट असणार आहे. यात रजनिकांतशिवाय अक्षय कुमार, अॅमी जैक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट जगभरातील 7000 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. ऑस्कर अवॉर्ड विनर ए. आर. रहमान रेहमान यांचे चित्रपटाला संगीत आहे. डॉक्टर रिचर्डच्या भूमिकेसाठी अक्षय कुमार पहिली पसंती नव्हता. या भूमिकेसाठी सुरुवातीला कमल हसन, आमीर खान, विक्रम, हॉलिवूड स्टार अरनॉल्ड, हृतिक रोशन आणि नील नितिन मुकेश यांच्याशीही चर्चा झाली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चित्रपटाच्या लोकेशनवरील काही फोटो, अखेरच्या स्लाइडवर मेकिंग व्हिडीओ.. 
बातम्या आणखी आहेत...