आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Malayalam Actress Bhavana Kidnapped And Molested. One Accused Arrested By Kochi Police

मल्याळम अभिनेत्री भावनाच्‍या अपहरणाचा प्रयत्न, कारमध्ये छेडछाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - मल्याळी सिनेमाच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची छेडछाड व अपहरणाचा प्रयत्न शनिवारी उघडकीस आला. अभिनेत्रीनेच गुंडांच्या कृत्याची आपबिती सांगितली.
 
शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. एका चित्रपटाच्या चित्रीकरणावरून परतताना अठानी भागात एका कारने तिच्या कारला धडक दिली. त्यानंतर काही लोक तिच्या कारमध्ये बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्यांनी चालकाला धमकावून गाडी चालवण्यास सांगितले. आरोपींनी अभिनेत्रीचे फोटो-व्हिडिआे बनवले व छेडछाडही केली. कोचीच्या पलारिवात्तोम पोहचल्यावर त्यांनी कार थांबवली व ते निघून गेेले. अभिनेत्री या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दिली. मल्याळममध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे.

भेदरलेल्या भावनाने दिग्दर्शकाच्या घरी घेतला आसरा...
घडलेल्या या प्रकारानंतर भावनाने कक्कानंद परिसरातील एका दिग्दर्शकाच्या घरी आसरा घेतला होता. सर्व प्रकार दिग्दर्शकाला सांगितल्यानंतर, त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
 
वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण...
वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या भावनाने अल्पावधीत मल्याळम सिनेमांत आपले वेगळे स्थान निर्माण केले. 'नाम्मल' या पहिल्याच सिनेमासाठी तिला अवॉर्डही मिळाला. त्यानंतर भावनाने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या करिअरमध्ये तिने दोनदा केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड आणि एकदा फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावी केला. याशिवाय बरेच पुरस्कार तिला मिळाले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... भावनाने दक्षिणेतील या अभिनेत्यांसोबत केले आहे काम... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...