आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समोर आले प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नाचे PHOTOS, या कारणामुळे आली होती लाइमलाइटमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नविधी पूर्ण करताना ज्योती कृष्णा आणि अरुण आनंद राजा - Divya Marathi
लग्नविधी पूर्ण करताना ज्योती कृष्णा आणि अरुण आनंद राजा

मुंबई/थ्रिसूरः प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री ज्योती कृष्णा अलीकडेच अभिनेत्री राधिकाचा भाऊ अरुण आनंद राजासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. ज्योती चित्रपटसृष्टीपासून काही काळाचा ब्रेक घेऊन दुबईत एफएमवर रेडिओ जॉकी म्हणून काम करत असतानाच्या काळात  दोघांची पहिली भेट झाली होती. अरुण दुबईतील एका फर्ममध्ये नोकरी करतो. या लग्नात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यामध्ये भावना, कृष्णप्रभा, श्रुती लक्ष्मी, रचना नारायणकुट्टी, सुरेश गोपी आणि जीतू जोसेफ या सेलिब्रिटींचा समावेश आहे. 


पोर्न साइट्सवर फोटो अपलोड झाल्याने चर्चेत आली होती ज्योती... 
- मार्च, 2016 मध्ये ज्‍योती कृष्‍णाचे फोटोज मॉर्फ करुन पोर्न साइट्सवर अपलोड झाले होते. यावरुन संतापलेल्या ज्योतीने फेसबुकवर लिहिले होते, चेहरा माझा असला तरी शरीर तुझ्या आईचे आहे. ती पुढे म्हणाली होती, की मी या घटनेवर सडेतोड उत्तर यासाठी दिले, की माझ्यासारख्या अनेक तरुणींना यामुळे कॉन्फिडन्स मिळावा. 


प्रॉडक्‍शन एग्झिक्‍यूटिव्हवर लावला होता लैंगिक छळाचा आरोप..
जून 2014 मध्ये ज्‍योतीने फिल्‍म प्रॉडक्‍शन एग्झिक्‍यूटिव्ह शाजी कवानाडच्या विरोधात लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर शाजीला फिल्म टेक्निशिअन असोसिएशनने सस्पेंड केले होते. 

 

2011 साली ज्योतीने सुरु केले होते करिअर...
ज्‍योती आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2011 साली 'बॉम्‍बे मार्च 12' या चित्रपटाद्वारे केली होती. तिने लास्ट बेंच (2012), गॉड फॉर सेल (2013), इथू पथिरामनल (2013), न्‍जान (2014) यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लाइफ ऑफ जोसुटी' (2015) हा तिचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, ज्योती कृष्णा आणि अरुण यांच्या लग्नाचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...