आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 45व्या वर्षी कॅन्सरने ग्रस्त मल्याळम गायिकेचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : राधिका टिळक
मल्याळम सिनेमाची प्रसिध्द गायिका राधिका टिळकचे निधन झाले आहे. ती 45 वर्षांची होती आणि तिला कॅन्सर होताय मागील दोन वर्षांपासून ती आजारावर उपचार घेत होती. काही दिवसांपूर्वी तिची तब्येत बिघडल्याने तिचा कोच्चीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी (20 सप्टेंबर) तिने जगाचा निरोप घेतला.
ऑस्कर पुरस्कार विजेते रेसुल पुकुट्टीने राधिकाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी टि्वट केले, 'RIP #RadhikaThilak, so sad to know that you left this world at such a young age.It feels unfair, my heartfelt condolences to the family!'
मल्याळम सिनेमांत गायले 70 गाणे-
राधिकाने मल्याळम सिनेमांत जवळपास 70 गाणे गायले आहेत. तिने 'Sanghaganam', 'Ottayalpattalam', 'Guru', 'Kanmadam', 'Ravanaprabhu' आणि 'Pranayam'सारख्या अनेक सिनेमांना आवाज दिला. सिनेमांमध्ये येण्यापूर्वी राधिकाला भक्तीगीतांसाठी ओळखले जात होते. तिने दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवरसुध्दा गाणे गायले आहेत. शिवाय तिने टीव्ही अँकर म्हणूनसुध्दा काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राधिकाचे काही फोटो...