आपल्या अभिनयाने मॉलिवूड सिनेसृष्टी गाजविणारे मल्याळम सुपरस्टार मोहनलाल हे आता चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेणार आहे. गेली तीन दशके चित्रपटसृष्टीत काम करणा-या या अभिनेत्याने एका मोठ्या प्रोजेक्टनंतर अभिनयातून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मनोरमामध्ये दिलेल्या वृत्तानुसार, पुढच्या काही वर्षांमध्ये सुपरस्टार मोहनलाल चित्रपटसृष्टीला अलविदा करणार आहेत. त्यांचा महत्वाकांक्षी चित्रपट असलेला ‘रंदामोझान’नंतर ते निवृत्ती घेणार आहेत. या चित्रपटाचा 600 कोटी रुपये इतका विशाल बजेट आहे. हा चित्रपट पुढील वर्षी येणार असल्याचे कळते. ‘रंदामोझान’ हा चित्रपट एम टी वासुदेवन नायर यांच्या हेच शीर्षक असलेल्या पुस्तकावर आधारित आहे. यामध्ये महाभारतातील भीमाची कथा मांडण्यात आलेली आहे.
आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत अभिनेता मोहनलाल यांनी 300 हून अधिक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, त्यांनी हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलगू या चित्रपटांमध्येही काम केले आहे. 56 वर्षीय या अभिनेत्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाकरिता चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
2016 हे वर्ष मोहनलाल यांच्या कारकिर्दीसाठी फारच चांगले गेले. ‘पुलीमुर्गन’ हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. तसेच या चित्रपटाने मॉलीवूड बॉक्स ऑफिसवरही कमाल दाखवत अनेक रेकॉर्ड मोडले. आतापर्यंत सर्वाधिक जास्त कमाई करण्याचा रेकॉर्डही या चित्रपटाने केला आहे. ‘पुलीमुर्गन’ चित्रपटाने जागतिक स्तरावर 130 कोटींची कमाई केली होती.
पुढील स्लाईड्सवर बघा, मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार मोहनलाल यांचे RARE PHOTOS...