आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाशी एकदा बोलता यावे म्हणून तिचे IT अकाउंट हॅक करणाऱ्या फॅनला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- करीना आणि एकता कपूरसह 5 सेलिब्रिटीजचे इन्कम टॅक्स अकाउंट हॅक करण्याच्या आरोपात मुंबई पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीला अटक केली आहे. पॅरा मिलिटरी फोर्सेमध्ये काम करणारा व्यक्ती करीनाचा फॅन आहे. तिचा नंबर मिळवण्यासाठी त्याने हे कृत्य केले आहे. आरोपीला हैद्राबाद येथून अटक करण्यात आले आहे. करीनाचे इन्कम टॅक्स अकाउंट हॅक करुन फायनान्शियल वर्ष 2016-17 चा चुकिचा क्वॉर्टरली आईटी रिटर्न टाकल्याची तक्रार दोन महिण्यांपूर्वी करीनाच्या सीएने केली होती.

कसे उघड झाले प्रकरण...
- माध्यमातील वृत्तानूसार, सप्टेंबरमध्ये करीनाने टॅक्स फाइल करण्यासाठी अकांऊंट लॉग इन केले तेंव्हा हे समोर आले.
- ऑगस्टमध्येच क्वॉर्टरली रिटर्न फाइल केलेले पाहून करीना हैराण झाली. यात इन्कम जास्त दाखवण्यात आली होती.
- त्यानंतर करीनाने सीएशी संपर्क केला आणि सीएने सायबर सेलकडे याची तक्रार केली.
- या आरोपीने एकुण 5 सेलीब्रिटींची अकाउंट हॅक केले होते. त्यात अरबाज खान, मेघना नायडू आणि एकता कपूर यांचा सामावेश आहे.
- 2016 मध्ये ऋतिक रोशनेही फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची तक्रार केली होती.
 
आयपी अॅड्रेसमुळे पकडला गेला आरोपी
- आरोपी करीनाचा फॅन आहे आणि तिच्याशी बोलता यावे यासाठी तो करीनाचा मोबाईल नंबर मिळवण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती डीसीपी सचिन पाटील यांनी दिली आहे.
- आरोपीने अनेक सेलेब्रिटींची पॅनकार्ड डिटेल्स जमा केली आणि त्यांचे इन्कम टॅक्स अकाउंट हॅक केले होते. आयपी अॅड्रेसवरुन त्याला पकडण्यात आले.
- आरोपी पॅरा मिलिटरी फोर्समध्ये ऑनलाइन टॅक्स फाइल करण्यासाठी त्याच्या मित्रांना मदत करत होता. त्यामुळे त्याला पुर्ण प्रोसेसची माहिती होती.
बातम्या आणखी आहेत...