आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिरा बेदीचा खुलासा, माझा मुलगा कॅमेरापासून राहातो चार हात लांब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदिरा बेदी तिचा मुलगा वीरसोबत. - Divya Marathi
मंदिरा बेदी तिचा मुलगा वीरसोबत.

मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्सची मुलं ही कायम मीडियामध्ये चर्चेत राहातात. मात्र मंदिरा बेदीचा मुलगा मीडियाच्या चर्चेपासून दूर राहातो. एका ताज्या इंटरव्ह्यूमध्ये मंदिराने सांगितले, की तिचा मुलगा सर्वसाधारण आयुष्य जगतो. त्याला स्पॉटलाइटपासून दूर राहाणे पसंत आहे. विशेष म्हणजे त्याला कॅमेरासमोर येणे देखील आवडत नाही. मात्र त्याला म्यूझिक आवडते. 

 

मंदिरा बेदीने फिल्ममेकर राज कौशलसोबत लग्न केले आहे. या कपलला आता 6 वर्षांचा मुलगा आहे. त्याचे नाव वीर आहे. मंदिराने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर ती विविध रोलमध्ये समोर येत राहिली आहे. ती कधी टीव्ही होस्ट असते, तर कधी क्रिकेट कॉमेंटेटर तर कधी प्रेझेंटर म्हणूनही समोर येते. लवकरच मंदिरा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. प्रभासची फिल्म 'साहो'मध्ये मंदिरा रुपरी पडद्यावर दिसेल. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मंदिरा आणि तिच्या मुलाचे 4 फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...