आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर विकत होता कोल्ड्रिंक्स, आज आहे बॉलिवूड सिनेमांचा निर्माता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानसोबत मनीष मुंदडा - Divya Marathi
आमिर खानसोबत मनीष मुंदडा
नागपुर: ‘मसान’ आणि ‘आंखों देखी’ सिनेमांचा निर्माता मनीष मुंदडा मंगळवारी (5 एप्रिल) नागपूरला आला होता. त्याने divyamarathi.comसोबत संवाद साधला. त्याने आयुष्यातील संघर्ष आणि निर्माता कसा झाला ही कथा आमच्यासोबत शेअर केली. त्याने सांगितले, की अभिनेता-दिग्दर्शक रजत कपूरला निर्माता मिळत नव्हता. त्यावेली त्यांनी टि्वटरवर राग व्यक्त केला आणि मनीष रजतला टि्वटरवर फॉलो करत होता. मनीषने रजतचे हे टि्वट वाचले आणि संपर्क साधला. मी सिनेमाचा निर्माता होऊ का, असे विचारले.
जाणून घ्या मनीष मुंदडाने काय-काय सांगितले...
- मनीषाने सांगितले, की त्याचे बालपणापासूनच सिनेमा बनवण्याचे स्वप्न होते. बालपणी सिनेमा पाहण्यासाठी पैसे चोरत होता.
- तो राजस्थान मारवाडी बॅकग्राऊंडचा आहे. बालपणी त्याने रस्त्यावर कोल्ड्रिंक्स विकून दिवस घालवले.
- सध्या तो इंडोरामा पेट्रोकेमिकल नाइजीरियामध्ये सीईओ आहे. सोबतच 'आंखो देखी' आणि 'मसान'सारख्या क्रिटिकल एक्लेम्ड सिनेमाचा निर्मातासुध्दा आहे.
- तो सांगतो, 'मसान' आणि 'आंखो देखी' कमर्शिअल सिनेमे नसले तरी त्यांची खूप प्रशंसा झाली.
‘आंखों देखी’मधून केली होती सुरुवात...
- मनीष मुंदडाने शालेय शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केले. फिल्मी करिअरची सुरुवात 2013मध्ये दिग्दर्शक रजत कपूरच्या 'आंखो देखी'मधून केली होती.
- या सिनेमात रजत कपूर, संजय मिश्रा, सीमा मुख्य भूमिकेत दिसले होते.
- त्यानंतर त्याने नीरज घेवनव्दारा दिग्दर्शित 'मसान' बनवला.
- या सिनेमात रिचा चढ्डा, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसले होते.
- आता त्याने पुन्हा एकदा रजत कपूरसोबत 'एक्स पास्ट इज प्रेजेंट' सिनेमा बनवला आहे.
- या सिनेमात रजत कपूर आणि अंशुमन झा, हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसले. सोबतच अनेक इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सुध्दा निर्मित करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मनीष मुंदडाचे निवडक फोटो...