आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बॉम्बे' चित्रपटावेळी लपून मेकअप करायची मनिषा, असा होता चित्रपटक्षेत्रातील प्रवास..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री मनिषा कोईरालाने वयाची 47 वर्षे पूर्ण केलेली आहेत. 16 ऑगस्ट रोजी जन्मलेली मनिषा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मुळची नेपाळी असलेली मनिषा गेली अनेक वर्षे चित्रपट क्षेत्रापासून लांब होती पण डियर माया या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे. चित्रपट फारसा चालला नसला तरी मनिषाच्या कामाचे कौतुक झाले. मनिषाच्या वाढदिवसानिमित्त आमच्या प्रतिनीधींनी मनिषाची खास मुलाखत घेतली. वाचा या मुलाखतीद्वारे कसा होता मनिषाचा चित्रपट प्रवास..
 
अभिनयक्षेत्रात यावे असे कधी वाटले ?
- माझ्या मामांनी एफटीआयआयमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यावेळी माझी उन्हाळ्याची सुटी चालु होती. त्यामुळे मामांनी मला एका जाहिरातीच्या बोलवले होते. ती जाहिरात फार चालली आणि त्यानंतर मला नेपाळी चित्रपटात भूमिका मिळाली. तेव्हा मला वाटले की मला कॅमेऱ्यासमोर फार चांगले फिल होते. त्यानंतर मी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. 
 
जेव्हा आपण मुंबईत आलीस तेव्हा कोणी ओळखत होते का ?
नाही, मला मुंबईबद्दल काहीच माहीत नव्हते. पण मीना अय्यर (सीनियर जर्नलिस्ट) माझ्या आईची मैत्रीण होती. तेव्हा मीना मला शेखर कपूर, बोनी कपूर, ऋषी कपूर या सर्वांना मला भेटवले. या सर्वच लोकांकडून मला चांगली वागणुक मिळाली. शेखर कपूर यांनी मसला सर्वात प्रथम साईन केले होते. चित्रपटाचे नाव होते दुश्मनी. पण तो चित्रपट कधी बनला नाही. पण ती एक दिवसाची मुंबई ट्रीप मला आत्मविश्वास देऊन गेली की मी अभिनेत्री बनु शकते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कसा मिळाला पहिला चित्रपट...
बातम्या आणखी आहेत...