आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजच्या आधीच टोरेंट वेबसाइटवर लीक झाला 'मांझी : द माउंटेन मॅन'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिग्दर्शक केतन मेहताचा आगामी 'मांझी : द माउंटेन मॅन' हा सिनेमा रिलीजपूर्वीच लीक झाला आहे. सिनेमाची प्रीव्यू कॉपी टोरेंट वेबासाइटवर लीक झाली आहे. या महिन्याच्या 21 तारखेला हा सिनेमा रिलीज होणारेय. रिलीजपूर्वीच सिनेमा लीक झाल्यामुळे याचा परिणाम थेट त्याच्या कमाईवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सत्य घटनेवर आधारित आहे 'मांझी : द माउंटेन मॅन'
'मांझी : द माउंटेन मॅन' हा सिनेमा एका गरीब मजदूर दशरथ मांझी यांच्या जीवनावर आधारीत आहे. पत्नीच्या प्रेमापोटी संपूर्ण डोंगर खोडून काढणा-या एका व्यक्तीची ही कथा आहे. ही भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली असून त्याच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री राधिका आपटे आहे.
यापूर्वी हे सिनेमेसुद्धा झाले आहेत लीक
एखादा सिनेमा रिलीजपूर्वी लीक होण्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वी 2009 मध्ये ह्यू जॅकमॅन स्टारर 'द वॉल्वरिन' हा हॉलिवूड सिनेमा, 2010 मध्ये 'तेरा क्या होगा जानी' हा बॉलिवूड सिनेमा आणि 2014 मध्ये 'द एक्सपेंडेबल' हा हॉलिवू़ड सिनेमा लीक झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या सिनेमाचे काही स्टिल्स, जे टोरेंट वेबसाइटवरुन घेण्यात आले आहेत...