आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाते तुटल्याच्या बातमीवर मनू पंजाबी म्हणाला, आम्ही अजूनही एकत्र आहोत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनू पंजाबी आणि प्रिया सैनी. - Divya Marathi
मनू पंजाबी आणि प्रिया सैनी.
एंटरटेनमेंट डेस्क - बिग बॉस कंटेस्टंट राहिलेल्या मनू पंजाबीबाबत एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे त्याने प्रिया सैनीबरोबरचे नाते तोडले आहे. मात्र स्वतः मनूने ही अफवा असून, प्रिया आणि मी एकत्र आहोत आणि आनंदी आहोत असे म्हटले आहे. बिग बॉस या रियालिटी शोमध्ये मनू आणि मोनालिसा यांच्यातील नात्यावर चांगलीच चर्चा झाली होती. 

बिग बॉस 10 मध्ये होते अनेक सर्वसामान्य चेहरे.. 
'बिग बॉस' सिझन 10 मध्ये सामान्य लोकांतून आलेले अनेक असे चेहरे होते, जे शोनंतर प्रसिद्ध झाले. मोनालिसा, मनवीर गुर्जरपासून ते नितिभा कौलपर्यंत अनेक असे चेहरे होते ज्यांना या शोने ओळख मिळवून दिली. हे सर्व आज सेलिब्रिटी झाले आहेत. यापैकी एक होता मनू पंजाबी. मनूने त्याच्या होणाऱ्या पत्नीशी नाते तोडले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दोघे सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मनूने स्वतः मात्र ही अफवा असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या बातम्या कोण पसरवतात माहिती नाही, पण प्रिया आणि मी आजही एकत्र आहोत, असे मनू म्हणाला. दोघे यावर्षीच गोव्यात लग्न करणार असल्याचेही समोर येत आहे. शोदरम्यान मनू आणि मोनालिसा यांच्यात जवळीकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे मनूची होणारी बायको प्रिया नाराजही झाली होती. पण मनू आणि मोनालिसाने ते दोघे केवळ मित्र असल्याचे वारंवार स्पष्ट केले. 

पुढे वाचा, मनू प्रिया आणि मोनालिसा यांच्याशी संबंधित काही बाबी...
 
बातम्या आणखी आहेत...