आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे सागरिका-झहीरचे ग्रॅण्ड रिसेप्शन, ही आहेत हॉटेलची वैशिष्ट्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान 23 नोव्हेंबर रोजी अभिनेत्री ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका घाटगे हिच्याशी मुंबईत विवाहबद्ध झाला. नोंदणी पद्धतीने दोघांनी विवाह केला. यावेळी दोघांच्या कुटुंबीयांसमवेत अनेक जवळचे मित्र उपस्थित होते. आज म्हणजेच 27 नोव्हेंबरला झहीर-सागरिका यांच्या विवाहाचा पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागतसमारंभ होणार असून, या सोहळ्यासाठी क्रिकेट आणि बॉलिवूडसह अनेक क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती उपस्थित राहतील. मुंबईतील ताज महल पॅलेस अँड टॉवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणा-या भव्य रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रिटींची मांदियाळी जमणार आहे. 


झहीर आणि सागरिका यांनी यंदा एप्रिल महिन्यात साखरपुडा उरकला होता. सागरिकाने अनेक मराठी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या ग्रॅण्ड रिसेप्शनपूर्वी झहीर आणि सागरिकाची कॉकटेल पार्टी आणि मेंदी सेरेमनी पार पडली. 

 

ही आहेत या हॉटेलची वैशिष्ट्ये...


> पूर्वी 'ताज महल पॅलस ऍण्ड टॉवर' असे या हॉटेलचे नाव होते. ते आता 'द ताज महल पॅलेस' असे आहे.


> या हॉटेलच्या इमारतीवर तांबड्या रंगातला गॉथिक शैलीतला एक घुमट आहे. याच हॉटेलवर 26/11 चा हल्ला झाला होता.  


> 26/11 चा हल्ल्यानंतर ताजच्या इंटीरीअरसाठी 175 कोटी खर्च करण्यात आला आहे.आणि 180 कोटींचा इनश्युरन्स यासाठी मंजूर झाला.


> मुंबईच्या वैभवांपैकी एक असणारी 'ताज महाल पॅलेस' हॉटेलची इमारत 114 वर्षे जुनी आहे. 


> 1903 साली या हॉटेलच्या निर्मितीसाठी तब्बल 25 लाखांचा खर्च आला होता.


> ताज महाल पॅलेसची निर्मिती गेट वे ऑफ इंडियाच्याही आधी 1903 मध्ये झाली. 


> या हेरिटेज वास्तूची ट्रेडमार्क म्हणून नोंदणी झाली आहे. 


> न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचं आयफेल टॉवर, सिडसीचं ऑपेरा हाऊस या ट्रेडमार्क असलेल्या जगातल्या अन्य प्रसिद्ध वास्तू आहेत.


> ट्रेडमार्क लाभलेली ताज महाल पॅलेस हॉटेलची इमारत भारतातली एकमेव आहे.


> या हॉटेलची सगळ्यात लक्षवेधी रूम ही टाटा रूम आहे. ही रूम 5000 sqft ची आहे. 


> ताजमध्ये एकुण 42 लक्झुरियस रूम्स आहेत, त्यापैकी 19 व्टिन रूम नवीन करण्यात आले आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, आतापर्यंत समोर आलेले झहीर-सागरिकाच्या लग्न, कॉकटेल आणि मेंदी सेरेमनीचे निवडक PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...