आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात संजय दत्तला भेटली पत्नी मान्यता, मित्रांनी केले B\'day Wish

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(येरवडा तुरुंगात संजय दत्तची बहीण प्रिया दत्त आणि पत्नी मान्यता दत्त)
मुंबई- मान्यता दत्तने पती आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला बर्थडे विश करण्यासाठी येरवडा तुरुंगात पोहोचली होती. यावेळी संजयची बहीण प्रिया दत्तसुध्दा मान्यतासोबत दिसली. 56 वर्षांचा झालेल्या संजयला 1993मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या आरोपात पाच वर्षांची शिक्षा झाली. त्यामधील 18 महिन्यांची शिक्षा त्याने पूर्वीच पूर्ण केली होती. इतर शिक्षा (42 महिने) पूर्ण करण्यासाठी मे 2013मध्ये त्यांना येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले. बातम्यांनुसार, संजय यावर्षीच्या अखेरपर्यंत बाहेर येऊ शकतो.
फ्रेंड्सने टि्वटरवरून दिल्या शुभेच्छा-
एकिकडे मान्यताने येरवडा तुरुंगात जाऊन संजयला शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे, संजूबाबाच्या जवळच्या फ्रेंड्सने (अजय देवगण, अनिल कपूर, राज कुंद्रा, मिलन लूथरिया, संजय गुप्ता आणि अनुभव सिन्हासह इतर) त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फ्रेंड्सने दिलेल्या शुभेच्छाचे टि्वट्स...