आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्नच्या नावावर विकला जात आहे राधिका आपटेचा चित्रपट, लीक झाले होते बोल्ड सीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अॅक्ट्रेस राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पार्च्ड' सिनेमाचा एक सीन काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर व्हायरल झाला होता. आता या चित्रपटाचा सहनिर्माता अजय देवगनसाठी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या डीव्हीडीला पॉर्न फिल्म सांगत बाजारात विकली जात आहे. भारतात 23 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.
कोलकत्याच्या बाजारपेठेत 90 रुपयांना डीव्हीडी
या चित्रपटाची डीव्हीडी पॉर्न फिल्म असल्याचे सांगून कोलकत्यात विकली जात आहे. या चित्रपटात अनेक बोल्ड आणि न्युड सिन्स आहेत. चित्रपट निर्मात्यांची याची माहिती सायबर सेलला दिली आहे. पण अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
अजय देवगन प्रोडक्शनमध्ये तयार झालेल्या 'पार्च्ड'ने आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये तब्बल 18 अवॉर्ड जिंकले आहेत. चित्रपटात राधिकासह तनिष्ठा चटर्जी, सुरवीन चावला, लहर खान आणि सिद्धी सेन हेही आहेत. लीना यादवने चित्रपट दिग्दर्शित केला आहे. गुजरातमधील तीन महिलांवर ही कथा आधारित आहे. त्यांना जुन्या रुढी तोडून मुक्त जीवन जगायचे असते.
मराठमोळी राधिका आपटे आहे विवाहित, पुण्यात गेले बालपण
एकाच वेळेस मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगु आणि तामिळ इंडस्ट्रीमध्ये काम करणारी अभिनेत्री राधिका आपटे गेल्यावर्षी अभिनेता रितेश देशमुखची प्रेयसी म्हणून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. गाजलेल्या 'लय भारी' या सिनेमात राधिकाने रितेश देशमुखसह स्क्रिन स्पेस शेअर केली होती. गेल्या वर्षी (2014 मध्ये) राधिकाचे वेगवेगळ्या भाषेतील एकून 9 सिनेमे रिलीज झाले होते. राधिकाचे आगामी 'बदलापूर' आणि 'हंटर' हे दोन हिंदी सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत. वेगवेगळ्या भाषांतील सुमारे 30 पेक्षा जास्त सिनेमांत तिने काम केले आहे.

पुढे वाचा, कायम चर्चेत राहणाऱ्या राधिका आपटेच्या खासगी आयुष्याविषयी.....
बातम्या आणखी आहेत...