आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ यांचे नातींना पत्र, स्कर्टच्या लांबीवरून तुमच्या चारित्र्याचे मोजमाप करण्याची संंधी देऊ नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमिताभबच्चन यांनी आपल्या नाती आराध्या आणि नव्या यांना हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे. त्यात मुलींसाठी जीवनाचा धडा तर आहेच, पण मुलींना बंधनात अडकवण्याचा थोरामोठ्यांना सल्लाही. नव्या १८ वर्षांची आहे. ती अमिताभ यांची कन्या श्वेता बच्चन निखिल नंदा यांची मुलगी आहे. चार वर्षांची आराध्या अभिषेक-ऐश्वर्या यांची लेक आहे.

अमिताभ यांनी फेसबुकवर पत्र आणि त्याचा व्हिडिओ जारी केला आहे. त्यात ते म्हणतात, हे पत्र यासाठी लिहितोय की ते फक्त तुमच्यासाठी नव्हे तर सर्व नातींसाठी आहे. त्यांचे पत्र त्यांच्याच शब्दांत...
नमस्ते आराध्या, मला माहीत नाही तू हे कधी वाचशील, मात्र हे माझे २०१६ मधील विचार आहेत.
नव्या नवेली, हॅलो, नमस्ते. मी तुम्हा दोघींना एक पत्र लिहिलंय. तेच वाचून दाखवतोय. ते इंटरनेटवरही टाकेन. कारण मला नाही वाटत की हे पत्र फक्त तुम्हा दोघींसाठी अाहे, ते तर प्रत्येक नातीसाठी आहे. ठीक आहे...

मायडियरेस्ट नव्या आराध्या,
तुम्हादोघींच्या नाजूक खांद्यांवर एका अत्यंत समृद्ध वारशाची जबाबदारी आहे. आराध्या, तिचे पणजोबा डाॅ. हरिवंशराय बच्चन आणि नव्या तिचे पणजोबा श्री. एच.पी. नंदा यांचा वारसा चालवत आहे. तुम्हा दोघींच्या पणजोबांनी तुमच्या आडनावांना मोठी प्रतिष्ठा, सन्मान मिळवून दिलेला आहे. तुम्ही दोघी नंदा वा बच्चन असाल, पण तुम्ही आहात मुली महिलाही... तुम्ही महिला असल्याने लोक तुमच्यावर त्यांचे विचार लादतील. ते सांगतील... असे कपडे घाला, असे वागा, कुणाला भेटायला जा, कुठे जाऊ शकता. पण तुम्ही लोकांच्या निर्णयांच्या छायेत जगू नका. स्वत:च्या बुद्धीने निर्णय घ्या. तुमच्या स्कर्टच्या लांबीवरून तुमच्या चारित्र्याचे मोजमाप करता येईल, असे कुणालाही वाटू देऊ नका. तुम्ही कुणाशी मैत्री करावी, याबाबतही दुसऱ्यांकडून सल्ला घेऊन मित्र बनवू नका. लग्नही एकाच कारणामुळे करा, की तुम्हाला करायचंय म्हणून. लोक टोमणे मारतील, भलेबुरे म्हणतील. पण, तुम्ही सर्वांचेच ऐकावं, असा त्याचा अर्थ नाही. लोक काय म्हणतील, याची चिंता करू नका. शेवटी तुम्हालाच तुमच्या निर्णयांचे परिणाम भोगायचे आहेत. म्हणून दुसऱ्या कुणालाही आपले निर्णय घेऊ देऊ नका.

नव्या, तुला तुझ्या नाव-आडनावामुळे जी ओळख मिळाली आहे, ती तू ‘महिला’ असल्याने संभाव्य संकटांपासून वाचवणार नाही. पण या नकारात्मकतेमुळे स्वत:ला निराश होऊ देऊ नकोस. कारणमाणसात अनेक सद््गुणही असतात.

आराध्या, जेव्हा हे पत्र वाचवण्याच्या, समजण्याइतकी मोठी होशील तेव्हा बहुतेक मी येथे असेल-नसेल. पण मला वाटतं की, मी जे आज सांगतोय ते तेव्हाही संयुक्तिक असेल.
महिलांसाठी या जगात राहणे खूप अवघड असू शकते. मात्र, मला विश्वास वाटतो की तुमच्यासारख्याच महिला हे चित्र पालटतील. आपल्या सीमारेषा ठरवणे, आपले निर्णय स्वत: घेणे, लोकांचे निर्णय नाकारून स्वत:ला सावरणे तुमच्यासाठी सोपे नसेल. मात्र, तुम्ही... अवघ्या जगातील महिलांसाठी उदाहरण ठरू शकाल, असे करून दाखवा. आणि तुमचे यश माझ्यापेक्षा जास्तच असल्याचे सिद्ध होईल. आणि मी ‘अमिताभ बच्चन’पेक्षा तुमचा आजोबा म्हणून ओळखला गेलो तर मला जास्तच अभिमान वाटेल.
विथऑल माय लव्ह
- यूअर दादाजी, यूअर नाना..

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अमिताभच्‍या नातीसह या सेलिब्रेटींजच्‍याही मुली दिसल्‍या बिकनीमध्‍ये, पाहा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...