Home »News» Masaba Gupta Is One Of The Biggest Names In The Indian Fashion Industry

सोशल मीडियावर लोक म्हणाले 'अनौरस वेस्‍ट इंडियन', नीना गुप्तांच्या मुलीने दिले सडेतोड उत्तर

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 18:16 PM IST

  • आई नीना गुप्तांसोबत मसाबा गुप्ता
मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता फॅशन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. अलीकडेच मसाबाने सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्ली एनसीआर परिसरात फटाके विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्यणाचं तिने समर्थन केलं आहे. या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल काही आक्षेपार्ह प्रतिक्रियांचा मात्र आता मसाबाला सामना करावा लागत आहे. फटाके बंदीच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या मसाबावर नेटकऱ्यांनी आगपाखड करण्यास सुरुवात केली.
वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी असल्यामुळेही तिच्यावर निशाणा साधण्यात आला. नेटकऱ्यांकडून होणारा विरोध पाहता शेवटी मसाबाने त्यांना कठोर शब्दांत उत्तर देत सर्वांच्या चपराक लगावली. ट्वीटर अकाऊंटवरुन मसाबाने एक लांबलचक संदेश लिहित नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांविषयी तिचं मत मांडलं.
मसाबाने तिच्या ओपन लेटरमध्ये लिहिले, “नुकतच मी फटाके विक्रीवरील बंदीचं ट्विट रिट्विट केलं. ही अतिशय सर्वसामान्य बाब होती. पण, काही क्षणांतच त्यावरुन माझ्यावर टीका करण्यास आणि माझी खिल्ली उडवण्यास सुरुवात झाली. माझ्या आईवडिलांच्या संबंधांवरुन ‘अनैतिक पाल्य’ म्हणत मला निशाणा करण्यात आलं. पण, दोन कर्तृत्त्ववान व्यक्तींची मी मुलगी आहे. माझं स्वत:चंही अस्तित्व असून, ते मी सिद्धही केलं आहे. दहा वर्षांची असल्यापासूनच माझी यावरून खिल्ली उडवली जातेय."
पुढे मसाबा लिहिते, "माझ्या कामातून आणि समाजाला मी दिलेल्या योगदानातून माझी नैतिकता स्पष्ट होत आहे. पण, तरीही मला अशा शब्दांनी संबोधणं तुम्हाला गौरवास्पद वाटत असेल तर त्याला माझी काहीच हरकत नाही. पण, एक गोष्ट लक्षात असू द्या की, इंडो- कॅरेबियन असण्याचा मला अभिमान असून, समाज ज्या गोष्टींना हाताळण्यास असमर्थ आहे अशा गोष्टींना मी घाबरत नाही. हे माझ्या ‘अनैतिक’ रक्तातच आहे.”
पुढे वाचा, मसाबाने लिहिले ओपन लेटर जसेच्या तसे...

Next Article

Recommended