आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूकेचे शेफ गॅरी महिगन म्हणतात, \'भारतीय रेस्तराँ मला माझ्या घरासारखे\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध शेफ आणि मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया शोचे जज गॅरी महिगन यांना या शोच्या शूटिंगसाठी को-जज मॅट प्रेस्टनची वाट पाहायला अजिबात आवडत नाही. याचे कारण आहे, की मॅट नेहमीच शूटसाठी सेटवर उशिरा येतात. असेच काही किस्से गॅरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहेत. गॅरी सध्या बंगळुरु येथील वर्ल्ड ऑन द प्लेट फूड फेस्टिवलमध्ये सहभागी झाले आहेत. याशिवाय त्यांनी मुंबई आणि दिल्ली येथेही काही वेळ घालविला.
 
गॅरीसाठी भारतीय रेस्तराँ आहेत घरासारखे...  
गॅरी हे मुळचे यूकेचे आहेत, पण भारतीय रेस्तराँ त्यांना त्यांच्या घराप्रमाणे आहेत असे ते मानतात. त्यांना भारतीय जेवण फार आवडते. ते जेव्हा पहिल्यांदा भारतात आले होते तेव्हा त्यांनी चेन्नई, जोधपुर, मुंबई, दिल्ली यांसारख्या अनेक ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. त्यांना जेव्हा बॉलिवूड विषयी विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, की त्यांना बॉलिवूडविषयी जास्त काही माहिती नाही पण त्यांचे को-जज हे भारतीय चित्रपटसृष्टीचे चाहते आहेत कारण ते कलरफुल जॅकेट वापरतात आणि त्यांचा ड्रेसिंग सेंस चांगला आहे.
 
गॅरी यांनी सर्वात प्रथम भारतात टिक्का मसाला, पनीर, गुलाबजाम आणि जिलेबी खाल्ली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, गॅरी यांच्या मुलाखतीचा काही भाग...
बातम्या आणखी आहेत...