आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: ही आहे बॉलिवूडच्या 'शाकाल'ची मुलगी, सोशल साइट्सवर असते Active

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 1980 मध्ये रिलीज झालेल्या 'शान' या सिनेमातील 'शाकाल' ही व्हिलनची व्यक्तिरेखा साकारुन प्रसिद्ध झालेले अभिनेते कुलभूषण खरबंदा 71 वर्षांचे झाले आहेत. 21 ऑक्टोबर 1944 रोजी हसन अब्दल, पंजाब (आता पाकिस्तान) येथे जन्मलेले कुलभूषण 1974 पासून सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. श्याम बेनेगल यांच्या निशांत या सिनेमाद्वारे त्यांनी अभिनय करिअरमध्ये प्रवेश केला. याशिवाय 'मंथन', 'भूमिका', 'जुनून', 'शान', 'घायल', 'उत्सव', 'लगान', 'जोधा अकबर' आणि 'हैदर' या सिनेमांमध्ये ते झळकले आहेत.
एका मुलीचे वडील आहेत कुलभूषण
कुलभूषण यांच्या पत्नीचे नाव माहेश्वरी देवी खरबंदा आहे. या दाम्प्त्याला एक मुलगी असून तिचे नाव श्रुती खरबंदा आहे. श्रुतीविषयी फार माहिती उपलब्ध नाहीये. मात्र एका मुलाखतीत कुलभूषण यांनी सांगितले होते, की त्यांच्या मुलीपासून त्यांना प्रेरणा मिळते. त्यांनी म्हटले होते, "माझी एक मुलगी आहे, जिच्यासोबत मी फ्लर्ट करु शकतो, तिची मी सतत काळजी करत असतो आणि जिच्यासोबत मी सर्वकाही शेअर करु शकतो. मग ते एखाद्या सिनेमाविषयी असो वा तिच्या बॉयफ्रेंडविषयी. माझ्या गर्लफ्रेंडविषयीसुद्धा मी तिच्याशी डिस्कस करु शकतो (गंमतीने)."
सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव आहे श्रुती

श्रुती ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल साइट्सवर अॅक्टिव आहे. फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतची छायाचित्रे ती शेअर करत असते.
divyamarathi.com तुम्हाला श्रुतीची खास छायाचित्रे दाखवत आहे, ही छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर घेण्यात आली आहेत...
छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...