आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: हा आहे महाराष्ट्राचा हृतिक रोशन, एका शूटसाठी घेतो 25 हजार रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वरील फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन नव्हे हुबेहुब त्याच्यासारखा दिसणारा रुपेश एम. आहे. रुपेशने हृतिकसोबत कामदेखील केले आहे. रुपेशच्या सांगण्यानुसार, इमामीच्या डियोंड्रेंट जाहिरातीमध्ये जेवढे लाँग शॉट आहेत, ते सर्व त्याच्यावर चित्रीत करण्यात आले आहेत. शिवाय कोल्ड ड्रिंक माऊंटेन ड्यूच्या जाहिरातीतसुध्दा हृतिक केवळ पाच मिनिटांसाठी सेटवर आला होता आणि आपला डायलॉग बोलून निघून गेला. बाकी जाहिरात रुपेशवर चित्रीत करण्यात आली होती.

'मोहेंजोदडो' सिनेमात हृतिकच्या बॉडी डबलसाठी मिळाली होती ऑफर...
divyamarathi.comसोबत खास बातचीत करताना रुपेशने सांगितले, की अभिनेता म्हणून आणि बॉडी डबलच्या एका शूटसाठी 25 हजार रुपये मानधन घेतो. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'मोहेंजोदडो' सिनेमात हृतिकच्या बॉडी डबलसाठी त्याला ऑफर मिळाली होती, मात्र त्याने ती नाकारली.

'कहो ना प्यार है...'पासून झाला हृतिक चाहता-

2000पर्यंत रुपेश सलमान खानचा फॉलोअर्स होता, परंतु 'कहो ना प्यार है...' सिनेमाच्या रिलीजनंतर त्याचा विचार बदलला. तो सांगतो, 'मी सलमान खानला आदर्श मानत होतो. नेहमी मला त्याच्यासारखे दिसण्याची इच्छा होती. परंतु माझ्या मित्रांच्या कमेंट्सने मला बदलले. 'कहो ना प्यार है' रिलीज झाल्यानंतर मला अनेक फोन आले. सर्वजण म्हणत होते, मी आमिषा पटेलसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले? मला काहीच कळाले नाही, परंतु नंतर मला समजले, की त्यांचा माझ्यात आणि हृतिकमध्ये कन्फ्यूजन होतोय. तेव्हापासून मी हृतिकला फॉलो करायला लागलो.'
2003मध्ये बनला महाराष्ट्राचा हृतिक-
रुपेशच्या सांगण्यानुसार, 'कहो ना प्यार है'नंतर तीन वर्षे त्याचा बॉडी लँग्वेज, केस आणि बॉडीवर लक्ष केंद्रीत करावे लागले. 2003मध्ये लोक त्याला महाराष्ट्राचा हृतिक म्हणून ओळखू लागले. त्यादरम्यान त्याने असेही सांगितले, की त्याला पहिली ऑफर एका मराठी निर्मात्याने दिली होती. त्या निर्मात्याने त्याला आणि आणखी एका बॉलिवूड हमशक्लसोबत व्हिडिओ तयार केला होता, तो खूप हिट झाला. रुपेश सांगतो, 'त्या व्हिडिओनंतर मला 'बूगी बूगी', 'पहचान कौन', 'चंदा का कानून', 'सोन परी' आणि 'साका लाका बूम बूम'सारख्या शोमध्ये काम करण्याची मिळाली.'

स्वत: ओळख निर्माण करायची आहे-
रुपेशने सांगितले, की लोकांना त्याला हृतिकचा हमशक्ल म्हणून न ओळखता रुपेश नावाने ओळखावे. त्यासाठी त्याने स्वत:ची डान्स स्कूल 'नक्षत्र मॉडर्न आर्ट अँड डान्स अॅकाडमी' सुरु केली आहे. शिवाय तो मुंबईच्या इतर शाळेमध्येसुध्दा डान्स शिकवतो. तो म्हणतो, 'लोकांनी मला उत्कृष्ट डान्सर म्हणून ओळखावे.' रुपेश आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत करत आहे.
रुपेशच्या सांगण्यानुसार, '2003मध्ये मी वर्ल्ड डान्स ओलिंपियाडसाठी मास्कोला गेलो होतो. त्यानंतर 2014मध्ये बॉलिवू़ड इंटरनॅशनल परिक्षक म्हणून बुल्गारियालासुध्दा गेलो होतो. मी नॅशनल व्हॉइसओव्हर आर्टिस्टसुध्दा आहे आणि अनेक सिनेमे आणि कार्टून्सना आवाज देतो.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा महाराष्ट्रच्या हृतिक रोशनची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...