आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Oksana Rasulova The Look Alike Of Preity Zinta

प्रिती झिंटा नव्हे ही आहे तिची परदेशातील हमशक्ल, हिंदी शोमध्ये झळकली आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : ओक्साना रासुलोवा - Divya Marathi
फाइल फोटो : ओक्साना रासुलोवा
मुंबई- प्रिती झिंटा आज 41 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म हिमाचचल प्रदेशात 31 जानेवारी 1975ला झाला. प्रितीची फॅन फॉलोइंग खूप आहेत. परंतु तिच्यासारखी दिसणा-या एका परदेशी अभिनेत्रीने खूप चर्चा एकवटली. 2014मध्ये जेव्हा अजरबैजानची ओक्साना रासुलोवा इंडियन टेलिव्हिजनवर दिसली तेव्हा प्रत्येकजण तिला पाहतच राहिला. ती एक रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती, परंतु सर्वात जास्त चर्चा तिच्या लूकमुळे झाली.
तिची लूकच्या चर्चेचे काय कारण होते...
'इंडियाज बेस्ट सिने स्टार की खोज' शोमध्ये दिसल्यानंतर अनेक लोकांनी ओक्सानाला कॉम्प्लीमेंट दिले, की ती बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटासारखी दिसते. स्वत: ओक्सानानेसुध्दा सिनेस्टार्स की खोजमध्ये खुलासा केला होता, की लोक तिला प्रिती झिंटाची हमशक्ल म्हणतात. ओक्साना इंडियन नाहीये, परंतु तिला भारतीय सिनेमाची ओढ आहे. त्यामुळे ती भारतात आली.
अजरबैजानमध्ये झाला ओक्सानाचा जन्म...
ओक्सानाचा जन्म अजरबैजानची राजधानीच्या बकुमध्ये झाला होता. 19 डिसेंबर 1982ला जन्मलेल्या ओक्सानाने 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज'दरम्आन सांगितले होते, की ती तिच्या देशात खूप प्रसिध्द आहे. मात्र तिला हिंदुस्तान आवडते. हिंदुस्तानमधील जेवण असो अथवा येथील डान्स असो, तिला या सर्वांची ओढ आहे.
ओक्सानाला करायचे आहे हिंदी सिनेमांत काम...
झीटीव्हीच्या 'इंडियाज बेस्ट सिने स्टार की खोज' शोदरम्यान ओक्सानाने सांगितले होते, की भारतीय सिनेमाची ती खूप मोठी चाहती आहे. तिने सांगितले होते, 'मला हिंदी मूव्हीज पाहायला आवडते. माझी इच्छा आहे, की मी हिंदी सिनेमांत काम करावे.' यावेळी तिने असेही सांगितले होते, 'माझी हिंदी खूप वाईट आहे. परंतु माझे म्हणणे सर्वजण समजू शकतात आणि माझ्यासाठी हिंदी शिकणे कठिण नाहीये.'
हृदयात आहे हिंदुस्तान...
झीटीव्हीच्या 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज'दरम्यान ती म्हणाली होती, तिच्या हृदयात हिंदुस्तान आहे. ओक्साना म्हणाली होती, 'जर माझा देश अजरबैजान आहे तर माझ्या मनात हिंदुस्तान आहे.' 2014मध्ये अजरबैजानची इंडियन एम्बेसीने ओक्सानाला गॉडेस ऑफ डान्स अवॉर्ड दिला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ओक्सानाचे काही PHOTOS...