आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे शाहरुखची बहीण आणि मेहुणा, पाकिस्तानात वास्तव्याला आहे फॅमिली मेंबर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुलत बहीण नूरजहां आणि तिच्या पतीसोबत शाहरुख खान - Divya Marathi
चुलत बहीण नूरजहां आणि तिच्या पतीसोबत शाहरुख खान
मुंबईः बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आज 52 वर्षांचा झाला आहे.  2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्लीत त्याचा जन्म झाला. शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद स्वातंत्र्य सेनानी होते तर आई लतीफ फातिमा खान या मॅजिस्ट्रेट होत्या. याशिवाय शाहरुखला एक थोरली बहीण असून शहनाज लालारुख हे तिचे नाव आहे. शहनाज शाहरुखपेक्षा सहा वर्षांनी मोठी असून अद्याप अविवाहित आहे. शाहरुख तिचा सांभाळ करतोय. गौरी खान हे शाहरुखच्या पत्नीचे नाव असून या दाम्पत्याला आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुले आहेत. या सर्व फॅमिली मेंबर्सना त्याचे फॅन्स ओळखतात. पण शाहरुखचे काही फॅमिली मेंबर्स असे आहेत, ज्यांच्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शाहरुखच्या कजिन्सविषयी सांगतोय, जे पाकिस्तानात राहतात. 
 
पाकिस्तानमध्ये येथे वास्तव्याला आहेत शाहरुखचे नातेवाईक... 
- पाकिस्तानच्या पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार परिसरातील शाहवाली कताल या गल्लीत शाहरुखचे कजिन्स म्हणजेच काकाची मुले वास्तव्याला आहेत. शाहरुखचे काका गुलाम मोहम्मद गामा फ्रीडम फायटर होते.
- गुलाम मोहम्मद यांचा मुलगा मन्सूर खान पेशावरमध्ये बांबूच्या शिडी बनवायचे काम करतात. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की शाहरुख त्यांचा धाकटा भाऊ मकशूद खानच्या सर्वाधिक क्लोज होता.
- मन्सूर खान यांनी मुलाखतीत पुढे सांगितले होते, की 1978 साली शाहरुख पहिल्यांदा त्याच्या वडिलांसोबत पेशावरमध्ये आला होता.  1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर शाहरुखचे वडील मायग्रेट होऊन नवी दिल्लीत स्थायिक झाले होते.
- मन्सूर खान यांच्या मते, शाहरुखला पेशावरच्या आजूबाजुचा परिसर पसंत होता. तो दीर्घकाळापासून येथे आता आलेला नाही. 
- मन्सूर आणि मकसूदशिवाय गुलाम मोहम्मद यांना एक मुलगी आहे. तिचे नाव नूर जहां (मुन्नी) आहे. 1997 साली ती मुंबईत आली होती आणि अडीच महिने शाहरुखच्या घरी वास्तव्याला होती.
- नूर जहां शाहरुखवर एवढी इम्प्रेस आहे, की तिने आपल्या मुलाचे नाव शाहरुख ठेवले आहे.

शाहरुखला पसंत आहे येथील पेशावरी चप्पल
- मन्सूर खान यांनी सांगितल्याप्रमाणे, शाहरुख खानला पेशावरची पेशावरी चप्पल अतिशय पसंत आहे. 1980मध्ये जेव्हा SRK पेशावरमध्ये आला होता, तेव्हा त्याने येथून चप्पल खरेदी केली होती. सात वर्षे त्याने ती चप्पल वापरली होती.
- मन्सूर खान म्हणाले, की शाहरुखने शालेय जीवनात अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. 

पाच भावांमध्ये सर्वात लहान होते शाहरुखचे वडील
- शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद जान मोहम्मद यांच्या सहा मुलांमध्ये सर्वात लहान होते. मियां मोहम्मद, गुलाम मोहम्मद, अल्लाह बख्श आणि खान मोहम्मद ताज ही शाहरुखच्या वडिलांच्या मोठ्या भावांची नावे आहेत. मीर ताज यांना एक बहीणसुद्धा होती. तिचे नावखेर जान होते. 
- खेर जान, अल्लाह बख्श आणि मियां मोहम्मद यांनी कधीच लग्न केले नाही. गुलाम मोहम्मद आणि मियां मोहम्मद यांचे कुटुंब पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार परिसरात वास्तव्याला आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, शाहरुखच्या चुलत बहीणभावंडांची छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...