आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: भेटा सनी देओलचा थोरला मुलगा करणला, बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी आहे सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सनी देओलचा थोरला मुलगा करण देओल) - Divya Marathi
(फाइल फोटोः सनी देओलचा थोरला मुलगा करण देओल)
एन्टरटेन्मेंट डेस्कः भारतीय सिनेसृष्टीत अभिनेता सनी देओलला जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखले जाते. सनीने आज वयाची 58 वर्षे पूर्ण केली आहेत. याकाळात सनी काही निवडक सिनेमांमध्येच झळकत आहे. आता त्याचा मुलगा त्याच्या पावलावर पाऊल ठेवत बी टाऊनमध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे.
करण देओल हे सनीच्या थोरल्या मुलाचे नाव असून तो बॉलिवूडमधील बारकावे शिकत आहे. 'यमला पगला दिवाना 2' या सिनेमासाठी करणने सहायक दिग्दर्शक म्हणूनदेखील काम केले आहे. आता तो हीरोच्या रुपात आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे.
बातम्यांनुसार, 2016 मध्ये धर्मेंद्र यांच्या होम प्रॉडक्शनच्या सिनेमातून करण मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. यासाठी त्याने राहुल रावल्स यांचे अॅक्टिंग स्कूल जॉईन केले आहे. करणने यूकेमधील एक्सफोर्ट स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सनी देओलच्या लाडक्या मुलाची खास छायाचित्रे...