आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : भेटा रोशन कुटुंबाला, जाणून घ्या राकेश रोशन यांच्या Family Members विषयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून गायक मोहम्मद रफी, रोशनलाल नागरथ, इरा रोशन, राजेश रोशन आणि राकेश रोशन) - Divya Marathi
(डावीकडून गायक मोहम्मद रफी, रोशनलाल नागरथ, इरा रोशन, राजेश रोशन आणि राकेश रोशन)
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमध्ये रोशन कुटुंबाचा उल्लेख होताच हृतिक रोशनचे नाव सर्वांच्या ओठांवर येते. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी फिल्म इंडस्ट्रीतील जेवढी लोकप्रियता मिळवली, त्याहीपेक्षा हृतिक अधिक लोकप्रिय झाला आहे. हृतिकचे वडील आणि बॉलिवूडचे यशस्वी अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन यांचा आज वाढदिवस आहे. 

राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून 1970 मध्ये 'घर घर की कहानी' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास 40 सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'खुदगर्ज' (1987) या सिनेमाद्वारे आपली सेकंड इनिंग सुरु केली. 'काला बाजार', 'किशन कन्हैया', 'करण अर्जुन', 'कहो ना प्यार है', 'कोई मिल गया', 'क्रिश' या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन केले.
 
मुलगा हृतिकला त्यांनी 'कहो ना प्यार है' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत सुपरस्टार बनवले. तसे पाहता, हृतिकने आपल्या वडिलांपेक्षा जास्त लोकप्रियता प्राप्त केली आहे. बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या यादीत हृतिकची गणती होते.
 
हृतिक त्याची पत्नी सुझान खानपासून कायदेशीररित्या कायमचा विभक्त झाला आहे.
रोशन कुटुंबातील राकेश आणि हृतिक यांनाच लोक जास्त ओळखतात. रोशन कुटुंबाविषयी लोकांना फारसे ठाऊक नाहीये. रोशन यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.आज राकेश रोशन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला रोशन कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन देत आहोत.
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या रोशन कुटुंबातील सदस्यांविषयी...
 
बातम्या आणखी आहेत...