आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि सलमान म्हणाला, \'लोकांना एक खान परवडत नाही, तुम्ही तिघांविषयी बोलताहेत\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः करीना कपूर खान आणि सलमान खान)
मुंबईः सुपरस्टार सलमान खानने गुरुवारी (18 जून) आपल्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. यावेळी सलमानसह सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान, अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हजर होते.
इव्हेंटमध्ये एका पत्रकाराने सलमानला तीन खान कधी सोबत काम करणार? असा प्रश्न विचारला. तेव्हा सलमानने गमतीशीर अंदाजात उत्तर दिले. तो म्हणाला, "सिनेमात एक खान लोकांना परवडत नाही, तुम्ही तिघांविषयी बोलताहेत." मात्र आमिर आणि शाहरुखसोबत एका सिनेमात काम करण्यास नक्की आवडेल, असेही तो यावेळी म्हणाला.
'बजरंगी भाईजान' या सिनेमाची निर्मिती सलमान खान आणि रॉकलाइन वेंकटेश यांनी संयुक्तरित्या केली आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 17 जुलै रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये क्लिक झालेली निवडक छायाचित्रे...