आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : दक्षिण आफ्रिकेची डेमी लेई ठरली Miss Universe 2017

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स 2017’चा मुकूट दक्षिण आफ्रिकेच्या डेमी लेई नेल्स-पीटर्सने पटकावला आहे. 26 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार लास वेगास येथे सायंकाळी सात वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार 27 नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता) ‘मिस युनिव्हर्स 2017’ची स्पर्धा रंगली.


यंदाची मिस युनिव्हर्स डेमी लेई नेल्स-पीटर्सनला मानाचा मुकुट घालण्याचा मान मागील वर्षीची विजेती सौंदर्यवती आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिला मिळाला. दक्षिण आफ्रिकेसाठी हा किताब पटकावणारी डेमी लेई ही दुसरी सौंदर्यवती आहे. याआधी मार्गारेट गार्डिनर हिने १९७८मध्ये हा किताब जिंकला होता. 


डेमी लेईमुळे दक्षिण आफ्रिकेची तब्बल 39 वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. ‘मिस युनिव्हर्स 2017’मध्ये कोलंबियाच्या लॉरा गोंझालेझने दुसरे तर जमैकाच्या डेव्हिना बेनेटने तिसरे स्थान मिळवले.‘मिस युनिव्हर्स 2017’मध्ये सौंदर्यवती श्रद्धा शशीधरने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, या स्पर्धेत भारताला हा किताब मिळवून देण्यासाठी ती अपयशी ठरली. 


पुढील स्लाईड्सवर बघा, मिस युनिव्हर्स डेमी लेई नेल्स-पीटर्सचे Photos...

बातम्या आणखी आहेत...