आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शशी थरूर यांंच्या ट्विटला मिस वर्ल्ड मानुषीने दिले सडेतोड उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शनिवारी मानुषी छिल्लर या भारतीय युवतीने ' मिस वर्ल्ड' या किताबावर आपलं नावं कोरलं. भारताकडे तब्बल 17 वर्षांनंतर  मिस वर्ल्ड' हा किताब आला. त्यामुळे भारतीय आनंदामध्ये होते. अशातच शशी थरूर यांनी एक ट्विट केले आणि पुन्हा ट्विटरवर वाद रंगला. 

 

मानुषीनेसुद्धा दिले शशी थरुर यांना सडेतोड उत्तर..

मात्र त्यानंतर आता थेट मानुषीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. मानुषीने ट्विट करताना छिल्लर या नावाचा अपभ्रंश केलेला असला तरीही त्यामधील सकारात्मक बाजू बघा अशा आशयाचं ट्विट केलं आहे. मी अपसेट नाही कारण चिल्लर मध्येही 'चिल' हा शब्द आहे, असे तिने म्हटले आहे.  

 
महिला आयोग दाखल करणार तक्रार
याप्रकरणी आता महिला आयोग शशी थरुर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.  
 
शशी थरुर यांचे ट्विट आणि माफीनामा.. 

शशी थरूर यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीवरील अपयश ठळक करण्यासाठी मानुषी छिल्लरच्या आडनावाचा वापर केला होता. आमच्याकडे 'चिल्लर' ही मिस वर्ल्ड होते. अशा आशयाचे एक ट्विट शशी थरूर यांनी केले होते.  मात्र ट्विटरवर अनेकांनी संतापजनक प्रक्रिया दिल्यानंतर शशी थरूर यांनी माफी मागितली.  'माझं ट्विट हा केवळ मस्करीचा भाग होता. त्यामध्ये मिस  वर्ल्डचा अपमान  करण्याचा कोणताही हेतू नव्हता' असे त्यांनी म्हटले. 

 

अनुपम खेर यांनी घेतला समाचार... 

अभिनेते अनुपम खेर यांनीदेखील शशी थरूर यांच्या ट्विटचा समाचार घेतला. त्यांनी ट्विट करून  'तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर कसे येऊ शकता ?' असा सवाल त्यांनी विचारला. 

 

शनिवारी चीनमध्ये 2017च्या मिस वर्ल्डचा अंतिम सोहळा पार पाडला. यामध्ये 20 वर्षीय मानुषीने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला. यापूर्वी प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब पटकवला होता.  मानुषीचे वैद्यकिय शिक्षण सुरु असून हार्ट स्पेशालिस्ट व्हायचा तिचा मानस आहे.   

 

पुढे वाचा, शशी थरुर यांनी मागितली माफी आणि मानुषीचे ट्वीट... 

बातम्या आणखी आहेत...