आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथून चक्रवर्तींच्या पहिल्या सिनेमाचे PHOTOS, अनेक अवॉर्ड्सवर कोरले होते नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळः अलीकडेच भोपाळ या शहरात आयोजित करण्यात आलेल्या 'एकाग्र' या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मृणाल सेन यांचा आर्ट सिनेमा असलेला मृगया सिनेमा दाखवण्यात आला. 1976 मध्ये रिलीज झाले 'मृगया' हा अभिनेता मिथून चक्रवर्तीचा पहिला सिनेमा होता. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते.
उत्कृष्ट अभिनयासाठी मिथून यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मात्र या सिनेमानंतर बरेच दिवस त्यांना सिनेमांत काम मिळाले नव्हते.
या सिनेमात त्यांनी 'मृगया' नावाच्या अशा तरुणाची व्यक्तिरेखा वठवली होती, जो इंग्रजांनी पत्नीच्या केलेल्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवतो. या सिनेमाची कथा मोहित चट्टोपाध्याय आणि अरुण कौल यांनी लिहिली आहे. तर संगीत सुनील चौधरींचे आहे. या सिनेमाला वेगवेगळ्या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले होते. शिवाय सर्वोत्कृष्ट सिनेमाचा फिल्मेफेअर क्रिटिक अवॉर्डसुद्धा या सिनेमाने आपल्या नावी केला होता. 1977 मध्ये मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला गोल्डन फिल्मचे नॉमिनेशनसुद्धा मिळाले होते.
पुढे पाहा, 'मृगया' सिनेमाची खास छायाचित्रे...