Home »News» MNS Chief Raj Thakchrey Daughter Start Her New Inning With Bollywood As Assistant Director

ही आहे राज ठाकरेची मुलगी, राजकारण सोडून आता करतेय हे काम

दिव्य मराठी वेब टीम | Sep 04, 2017, 10:24 AM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चीफ राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे राजकारण सोडून आता चित्रपटात तिचे करिअर करु पाहते आहे. चित्रपट 'जुडवा- 2' या कॉमेडी चित्रपटासाठी उर्वशीने दिग्दर्शक डेविड धवनला असिस्ट केले आहे. वडील राज ठाकरे यांच्या रॅलीमध्ये दिसली आहे उर्वशी..
- 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान उर्वशीने राज ठाकरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यावेळी उर्वशीही वडिलांप्रमाणेच राजकारणात येणार काय अशी चर्चा सुरु झाली होती.
- 2014 साली उर्वशीने बाईक रॅली आणि सभांमध्ये आईसोबत हजेरी लावली होती. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर उर्वशीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे.
- ठाकरे कुटुंब आणि चित्रपटांचे फार जुने नाते आहे. राज ठाकरेही अनेकदा चित्रपटांच्या प्रिमीयरला हजेरी लावतात.
- महाराष्ट्र सेनेने एक वेगळी चित्रपट सेना बनवली आहे जे पाकिस्तानी कलाकारांना विरोध करुन चर्चेत आले होते.
विवादास्पद वक्तव्याने आली होती चर्चेत..
- 2014 साली दलितांबद्दल विवादास्पद वक्तव्य करुन उर्वशी चर्चेत आली होती. तिने लिहीले होते आंबेडकर यांच्यासारखे लोक (वाईट शब्दाचा प्रयोग)
लक्षात ठेवले जाऊ शकतात तर मग बाळासाहेब ठाकरे का नाही?
- उर्वशीचे हे ट्वीटर अकाउंटवर फेक असल्याचे समोर आले होते.
चित्रपटाशी निगडीत आहेत हे ठाकरे कुटुंबीय..
- उर्वशीची आई शर्मिला ठाकरे प्रसिदध मराठी थिएटर आर्टीस्ट, अभिनेता, मोहन वाघ यांची मुलगी आहे.
- उर्वशी स्वतः आता चित्रपटक्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्वशी ठाकरेचे काही खास PHOTOS...

Next Article

Recommended