आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बजरंगी भाईजान’च्या पाकिस्तान रिलीजवर मनसे नाराज, वाचा काय म्हणतेय मनसे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बजरंगी भाईजान' रिलीज होणार पाकिस्तानात
सलमान खानचा चित्रपट रिलीज होण्याची वाट त्याचे भारतातलेच नाही, तर पाकिस्तानचे चाहतेही पाहतं असतात. आणि ब-याचदा ईदला आपली फिल्म रिलीज करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सलमान खानसह त्याच्या निर्मात्यांना सलमानची फिल्म पाकिस्तानातही रिलीज व्हावी अशी इच्छा असते. कधी सलमानची फिल्म रिलीज होते, तर कधी पाकिस्तान सेन्सॉर बोर्ड ती रिलीज करून देत नाही. पण यावेळी मात्र पाकिस्तानात राहणा-या एका छोट्या मुलीला तिच्या घरी सुखरूप पोहोचवयाचा विडा उचललेल्या बजरंगी भाईजानला मात्र पाकिस्तानात विजा शिवाय एन्ट्री मिळाली आहे.
पण ‘सतत भारतावर हल्ले चढवणा-या पाकिस्तानशी कला, साहित्य आणि चित्रपटविषयक कोणतीच देवाणघेवाण नको’, अशी ठाम भूमिका घेतलेल्या मनसे चित्रपट सेनेला मात्र ‘बजरंगी भाईजान’ची पाकिस्तानशी या ईंदच्यावेळी होणारी ही गळाभेट काही रूचलेली नाही आहे. असं असलं तरी, बाकी कलाकरांचा उघड-उघड विरोध करणारी मनसे चित्रपट सेना सलमान खान विरूध्द एक चकार शब्द काढतं नाहीये.
या शुक्रवारी ‘बिन रोये’ हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज करू दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या मनसे चित्रपट सेनेने सलमानला पाकिस्तानात चित्रपट रिलीज करू नये, अशी विनंतीही केली नाहीये. याबद्दल मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना विचारले असता ते म्हणतात, “पाकिस्तानात आपले चित्रपट प्रदर्शित करू इच्छिणा-या निर्मात्यांना ही जाण असायला हवी, की सीमेवर आपले जवान शहिद होत असताना, कलेचे आदान-प्रदान करण्याच्या नावाखाली किंवा तिथल्या चाहत्यांच्या इच्छेखातर पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करू नये. असे करणे, हे त्या बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा आणि त्यांच्या कुटूंबियांचा अनादर करणेच आहे. पण सलमानच्या चित्रपटाविषयी बोलाल, तर तो सलमानचा वयैक्तिक प्रश्न आहे. त्यांनी काय करावे आणि काय नाही, हे आम्ही सांगणारे कोण?... आम्हांला त्यात पडायचे नाही.”
कदाचित राज ठाकरे-सलमान खान यांच्या बालपणापासूनच्या मैत्रीमुळे असावे बहूधा, मनसे नाराज असली तरीही सलमान खानविषयी मनसेमध्ये कुठेही कटूता जाणवतं नाहीये.
पुढील पानावर पाहा, भाईजानचा ईदसाठीचा नवीन लूक