आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेने बंद पाडले जॉनच्या \'फोर्स 2\'चे शूटिंग, परदेशी कलाकारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे -  फोर्स 2 सिनेमाचे पोस्टर, उजवीकडे - कारवाई करण्यासाठी आलेले मनसेचे कार्यकर्ते, खाली - परदेशी कलाकार - Divya Marathi
डावीकडे - फोर्स 2 सिनेमाचे पोस्टर, उजवीकडे - कारवाई करण्यासाठी आलेले मनसेचे कार्यकर्ते, खाली - परदेशी कलाकार

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेने अभिनेता जॉन अब्राहम स्टारर ‘फोर्स 2’ या सिनेमाचे शुटिंग बंद पाडले आहे. वर्क परमिट नसतानाही परदेशी कलाकार सिनेमामध्ये काम करत असल्यामुळे मनसेने शुटिंग बंद पाडल्याचे समजते. मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु होते.

मनसेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परदेशी कलाकारांनीही ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “या सिनेमाच्या शूटिंगसाठी 30 परदेशी कलाकार आले होते या संदर्भात आम्ही पोलिसांना माहिती दिली असुन या परदेशी कलाकारांकडे योग्य ती कागदपत्रे आणि व्हिसा आहे का? यासंदर्भात पोलिसांनी तपासणी करावी”.

या शूटिंगसाठी काम करणा-यांपैकी काहींकडे काम करण्यासाठी आवश्यक असणारे वर्क परमिट आहे. मात्र अनेकांकडे ते नाहीये असेही शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसेने ज्यावेळी सिनेमाचं शूटिंग बंद पाडले, त्यावेळी सिनेमामध्ये भूमिका साकारणारा अभिनेता जॉन अब्राहमही सेटवर उपस्थित होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कारवाईदरम्यानची छायाचित्रे..