आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model And Actress Mitali Sharma Found Begging On Mumbai Roads

अभिनेत्री मुंबईत रस्त्यावर भीक मागताना आढळली, अनेक दिवसांपासून होती उपाशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चंदेरी दुनियेत अपयश आल्यानंतर अनेक कलाकारांचे आयुष्य उद्ध्वस्त होताना बॉलीवूडने पाहिले आहे. असेच भोग पुन्हा एका अभिनेत्रीच्या नशिबी आले आहेत. मिताली शर्मा नामक अभिनेत्रीला चोरी करताना आणि भीक मागताना पोलिसांनी अटक केली आहे.

काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध मॉडेल गीतांजली नागपाल हिलाही अशाच प्रकारे रस्त्यावर भीग मागताना पाहण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ओशिवरा भागात २५ वर्षीय मिताली शर्माला लोखंडवालाच्या रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिले होते. या वेळी तिला ओळखीच्या लोकांनी घरी नेण्याचा प्रयत्न केला होता. यातच कुटुंबीयांनी तिची साथ सोडल्याचे समोर आले आहे.
काही वर्षांपूर्वी मिताली चित्रपटात करिअर करण्यासाठी मुंबईत अाली होती. मात्र, टीव्ही मालिका आणि भाेजपुरी चित्रपट केल्यानंतर तिला काम मिळाले नाही. त्यामुळे नैराश्य आले. पोट भरण्यासाठी तिने भीक मागणे सुरू केले. तसेच एका चोरी प्रकरणात तिला अटक झाली.
मिताली अनेक दिवसांपासून होती उपाशी
तिने कथन केलेली कहाणी ऐकून पोलिसही चक्रावून गेले. मितालीने गेल्या काही दिवसांपासून काहीही खाल्लेले नाही. तिला प्रचंड भुक लागली होती. पोलिसांनी पकडले तेव्हा तिने प्रथम अन्नाची मागणी केली. तिची स्थिती बघता ती गेल्या दोन-तीन दिवसांपासून रस्त्यावर भटकत असल्याचे दिसते. मुंबईत ती एकटीच राहत असल्याचे समोर आले आहे.
मानसिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
मितालीला मानसिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. चित्रपटांमध्ये काम करण्यास तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे ती घरुन पळून आली होती. पण तिला अपेक्षित यश मिळाले नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबत असलेले नाते तोडले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मिताली शर्मा होती एकेकाळी प्रसिद्ध माॅडेलिंग... करायची उत्तम अभिनय....वाचा कशी रस्त्यावर सापडली होती गितांजली नागपाल....