आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात हायप्राेफाइल देहव्यापार; सुटका केलेली अभिनेत्री पुन्हा पळाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील एम. जी. रस्त्यावरील एका पंचतारांकित हाॅटेलवर पाेलिसांनी मंगळवारी पहाटे छापा टाकून एका माॅडेल अभिनेत्री अर्शी खान हिची सुटका केली. ती मूळची भाेपाळची रहिवासी अाहे. विशेष म्हणजे सदर अभिनेत्रीला पाेलिसांनी रेस्क्यू हाेममध्ये नेले असता तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करून ही अभिनेत्री पसार झाली.

याप्रकरणी पाेलिसांनी विपुल पवन बहाद्दर दहाल (वय २८, मूळ रा. अासाम) या एजंटला अटक केली अाहे. त्याचे साथीदार कृष्णा कफाले (रा. पुणे, मूळ रा. अासाम) राेहन (रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला.

अराेरा टाॅवर्स या पंचतारांकित हाॅटेलमध्ये कृष्णा नावाचा एजंट वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी सापळा रचून हाॅटेलमधील रूम नं. ३०६ मध्ये छापा टाकला असता, तिथे वेश्याव्यवसाय करवून घेणारा एजंट विपुल दहाल हा पीडित अभिनेत्रीसाेबत सापडला. त्याच्याकडील पैसेही जप्त करण्यात अाले. दरम्यान, विपुलच्या ताब्यातून २७ वर्षीय अभिनेत्रीची सुटका करण्यात अाली. पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध क्रिकेटपटूची अापण प्रेयसी असल्याचा दावा ती करत हाेती. दक्षिणेतील काही चित्रपटात अर्शी खानने भूमिका केल्या असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, पाेलिसांनी या अभिनेत्रीला हडपसर महंमदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये ठेवले. मात्र, त्या ठिकाणी अभिनेत्रीने गाेंधळ घालत तसेच बंदाेबस्तावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत पळ काढला. सरकारी कामात अडथळा अाणल्याबद्दल तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पुण्यातील वेश्याव्यवसायातील कुख्यात कल्याणी देशपांडे हिच्यावर नुकताच पाेलिसांनी माेक्का लावला अाहे. अशाच प्रकारे वेश्याव्यवसायात कार्यरत असलेल्या एजंटचे एकत्रित रेकाॅर्ड संकलन करण्याचे काम पाेलिसांनी सुरू केले असून रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती अद्ययावत झाल्यावर पुढील कारवाई केली जाणार अाहे.
कोण आहे अर्शी खान?
अर्शी खान ही भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी ती हैदराबादमध्ये एका तेलुगू सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.

अर्शी खान आणि शाहिद आफ्रिदीचं अफेअर?
दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत अर्शी खानचं अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. दुबईतील एका हॉटेलमध्ये दोघांना एकत्र पाहिल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालं होतं.
पुढे वाचा, शाहिद आफ्रिदीला भेटायला गेली होती अर्शी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...