आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive : मंत्र्याच्या बनावट पुतण्याशी झाले होते मॉडेल कृतिकाचे लग्न, समोर आले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृतिकाने विजय द्विवेदी याच्याशी लग्न केले होते. - Divya Marathi
कृतिकाने विजय द्विवेदी याच्याशी लग्न केले होते.
मुंबई - अॅक्ट्रेस कृतिका चौधरीच्या मृत्यू प्रकरणी अंबोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तिचा पूर्वाश्रमीचा पती विजय द्विवेदीला आरोपी बनवले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कृतिकाला डोक्यात मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

कोण आहे कृतिकाचा पूर्वाश्रमीचा पती 
- मुंबई पोलिस विभागाच्या सुत्रांनी कृतिकाबाबत एक अत्यंत दुःखद माहिती सांगितली आहे. त्यात कृतिकाला तिचा पूर्वाश्रमीचा पती विजयने कशाप्रकारे चीट केले होते हे सांगितले आहे. 
- तो कृतिकाला बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन मुंबईत घेऊन आला होता. 
- कृतिकाला विजयने काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांचा पुतण्या असल्याचे सांगितले होते. त्याचे हायप्रोफाइल लोकांशी संबंध असल्याने कृतिकालाही कधी शंका आली नाही. 
- कृतिकाशी लग्न केल्यानंतर विजयने त्याच्या पहिल्या पत्नीला सोडून दिले होते. 
- विजयने कृतिकाला बॉलिवूडची मोठी अॅक्ट्रेस बनवण्याचे आश्वासन दिले होते. त्याच अटीवर कृतिकाला तो मुंबईत घेऊन आला होता. 

अनेक सेलिब्रिटींनाही दिला धोका 
- 2012 मध्ये विजयला मुंबई पोलिसांनी उघडे पाडले होते. सेलिब्रिटींना धोका देणारा आरोपी असल्याचे तेव्हा उघड झाले होते. 
- त्याने चीट केलेल्या सेलिब्रिटींमध्ये गोविंदा, टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारी, बालाजी टेलीफिल्म्सची एकता कपूर, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांचा समावेश होता. 
- काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून त्यांच्या नावाने कोणीतरी चीट करत असल्याचे सांगितले होते. 
- चव्हाण यांनी हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवले होते. 
- त्यावेळी विजयला लोखंडवाला परिसरात एका इमारतीतून अटक केले होते. 
- त्याला क्राइम ब्रँचने अटक केली त्यावेळी त्याच्याबरोबर कृतिकालाही फ्लॅटमधून अटक करण्यात आली होती. 
- या घटनेने कृतिका खचून गेली होती. विजयने तिला दगा दिला हे समजल्यानंतर तिने त्याला घटस्फोट दिला होता. 
- कृतिका मर्डर प्रकरणी पोलिस विजयची चौकशी करत आहेत. 

विजयचे राष्ट्रकुल कनेक्शन 
- दिल्लीमध्ये विजयने तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडीशी संपर्क केला होता. जनार्दन द्विवेदीचा पुतण्या असल्याचे सांगत त्याने राष्ट्रकुल स्पर्धेचा मोफत पास मागितला होता. 
- त्यावेळी कलमाडी यांना संशय आल्याने त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देत तुरुंगात पाठवले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पहिल्या पत्नीला सोडले आणि कृतिकाबरोबर लग्न केले. त्यानंतर तो कृतिकाला घेऊन मुंबईला आला होता. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कृतिका मर्डर केसशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती..
 
 
बातम्या आणखी आहेत...