आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाणीची शिकार झालेल्या मॉडेलने सांगितले फॅशन वर्ल्डचे dirty secret

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल सिमरन - Divya Marathi
मॉडेल सिमरन
भोपाल: आशिमा मॉलमध्ये सोमवारी (6 जून) फॅशन शोमध्ये मॉडेल्समध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणाची तक्रार मिसरोद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणात मॉडेल सिमरनचा जबाब नोंदवण्यात आला. मॉडेलने divyamarathi.comला या प्रकरणामागील कथा सांगितली. मॉडेल सिमरनच्या सांगण्यानुसार, 'फॅशन शोचा आयोजक फैजान खानने मला प्रपोज केले होते आणि त्याचे प्रपोजल नाकारल्याने फैजानने त्याची मैत्रीण कनक सोनीला मला मारहाण करण्यास सांगितले. शोदरम्यान चेंजिंग रुममध्ये कनक दोन बाऊंसर्ससोबत आली होती, तिला मी विरोध केला.'
सिमरन म्हणाली, 'फैजानचा खरा चेहरा समोर आला'...
'मॉडेलिंग माझे पॅशन आहे. एका वर्षापूर्वी रीवाहून भोपाळला शिक्षण घेण्यासाठी आले होते. येथे मॉडेलिंग करणा-या मुलींसोबत मैत्री झाली. मीसुद्ध त्यांच्यासोबत एका वर्षात सात शो केले. जानेवारीमध्ये मिस्टर अँड मिस बॉलिवूड इन इंडिया शोमध्ये फैजानसोबत भेट झाली. तो शो पाहण्यासाठी आला होता. शो संपल्या नंतर तो स्टेजच्या मागे येऊन मला भेटला.'
'फैजान म्हणाला होता, की तो ओमेगा कूल इंडस्ट्रीचा संचालक आणि मॉडेल आहे. या बातचीतनंतर आम्ही दोन शो केले. त्याने सांगितले, की दिल्ली-मुंबईमध्येसुध्दा शो केले आहेत. फैजान म्हणायचा, की त्याला माझा परफॉर्मन्स आवडला तर तो माझी अनेक शो आयोजकांची भेट घालून देईल आणि शो मिळवून देईल.'
'त्याने सिनेमात काम देण्याचासुध्दा शब्द दिला होता. सतत बोलत संपर्कात राहिलो. मेसेजसुध्दा करत होतो. एकेदिवशी फैजानने मला प्रपोज केले. सोबतच म्हणाला, सोबत राहशील तर मोठी मॉडेल बनवेल. त्याचे प्रपोजल मी नकारले. त्यानंतर तो सतत मेसेज करत होता. मी त्याला
ब्लॉक केले. नंतर भेट झाली नाही.'
'हा शो मला माझ्या शिक्षा नावाच्या मैत्रीणने दिला, तीसुध्दा मॉडेलिंग करते. ती म्हणाली होती, एक शो आहे त्यात मॉडेलिंग करायची आहे. जून्या गोष्टी विसरून जा आणि फैजानचा शो कर. मी तिचे म्हणणे ऐकले आणि शोमध्ये गेले. तिथे फैजान दिसला नाही. मी चेंजिंग रुममध्ये गेले. अचानक शो स्टॉपर कनक सोनी तिथे पोहोचली. तिच्यासोबत दोन बाऊंसर्ससुध्दा आत आले. मी विरोध केला तर तिने माझा हात घट्ट पकडला. मला पायाने ठोकर मारली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मी जीव वाचवण्यासाठी तिथून पळाले आणि बेशुध्द होऊन खाली पडले. डोळे उघडले तर रुग्णालयात होते.'
आता नाही करणार मॉडेलिंग...
सिमरनची आई नीलिमा सिंह यांनी सांगितले, की त्यांच्या मुलीला मॉडेलिंगमध्ये ओळख निर्माण करायची होती. भोपाळमध्ये फॅशन शो तिच्या जीवावर बेतला. ग्लॅमर जगाचा असाही चेहरा पाहायला मिळेल असे वाटले नव्हते. आम्ही ठरवले आहे, की ती आता मॉडेलिंग करणार नाही.
कनक आणि फैजान चांगले नाहीत...
सिमरनचा भाऊ बघेल म्हणतो, 'शोचा आयोजक फैजान शोमध्ये उपस्थित नव्हता. एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्याने रुग्णालयात येऊन सिमरनची चौकशी केली. असे वाटते, की माझ्या बहिणीला मारहाण करण्याचा कनक आणि फैजानचा आधीच प्लान ठरलेला होता. अलीकडेच फैजानचे पबमधील एक प्रकरण समोर आले होते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मॉडेल सिमरनचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...