आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी पुण्‍यात घडला ‘मोहेंजोदडो’, पाहा, चित्रपटातील या 6 बाबी खटकतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कुठलीही पीरियड फिल्म बनवताना, दिग्दर्शकाला तो विशिष्ट काळ, तेव्हाचे वातावरण, माणसांचा वावर, पेहराव, शस्त्रे, वाहने, भाषा..अशा अनेक घटकांवर संशोधन करावे लागते. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘मोहेंजोदडो’ हा चित्रपट सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या पुरातत्त्वीय पुराव्यांशी ईमान राखणारा आहे, अशी माहिती डेक्कन कॉलेजचे संचालक आणि ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. वसंत शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

जगप्रसिद्ध सिंधू संस्कृतीच्या काळातले कथानक मांडणारा ‘मोहेंजोदडो’ हा चित्रपट प्रकल्प करण्याचे निश्चित ठरल्यावर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांनी सर्वप्रथम पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील डॉ. वसंत शिंदे यांच्याशी संपर्क साधला. चित्रपट सुरू करण्यापूर्वी दोन वर्षे ही भेट झाली, असे डॉ. शिंदे म्हणाले. गोवारीकरांनी स्वत:च चित्रपटाविषयी माहिती दिली आणि सहकार्य मागितले. माझ्यासोबत बडोद्याचे तीन संशोधक आणि एक अमेरिकेतील संशोधक, असे पाच जण होतो. सिंधु संस्कृती नेमकी कशी होती, तिची वैशिष्ट्ये काय होती, तेव्हाची नगररचना, वातावरण, वस्तू, पोषाख, भाषा, रस्ते, शस्त्रे, दागिने, केशरचना..असे अनेक तपशील गोवारीकरांनी जाणून घेतले. सिंधु संस्कृतीविषयीचे पुरातत्त्वीय पुरावे कोणते आहेत, याची माहिती घेतली, असेही डॉ. शिंदे म्हणाले.
पुराव्यांशी इमान राखणारा चित्रपट
डॉ. वसंत शिंदे म्हणाले,‘मी नुकताच मोहेंजोदडो चित्रपट पाहिला. चित्रपटातील कलात्मक स्वातंत्र्य वगळता, अन्य बहुतेक तपशील हे पुरातत्त्वीय पुरावे, संशोधन, लेखन व तज्ज्ञांची मते यांच्याशी ईमान राखणारे आहेत, याबद्दल गोवारीकर अभिनंदनास पात्र आहेत. तत्कालीन शहर त्यांनी उत्कृष्ट मांडले आहे. तेव्हाचे रस्ते, कपडे, दागिने, प्राणी, तटबंदी, भोवताल, वातावरण निर्मिती त्यांनी छान उभी केली आहे. मुख्य म्हणजे लागोपाठ आलेल्या महापुरांनी सिंधु संस्कृतीचा विनाश झाला, हे तथ्य त्यांनी व्यवस्थित मांडले आहे. चित्रपटाचे कथानक, कथानकाची मांडणी, व्यक्तिरेखा या तपशिलांसाठी कलात्मक स्वातंत्र्याची मुभा घेतलेली आहेच, पण कलादिग्दर्शनासाठी या संशोधनाचा आधार आहे, हे कौतकास्पद वाटते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, चित्रपटातील न पटलेल्या गोष्टी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...