आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा हृतिकवर मगरीने केला होता हल्ला, येथे शूट झाले 'मोहेंजोदारो'चे सीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरती सिनेमाच्या ट्रेलरचा शॉट, खाली सिनेमाच्या शूटिंगचा शॉट - Divya Marathi
वरती सिनेमाच्या ट्रेलरचा शॉट, खाली सिनेमाच्या शूटिंगचा शॉट
भोपाल: हृतिक रोशनचा 'मोहेंजोदारो' सिनेमाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. सिनेमा 12 ऑगस्टला रिलीज होत आहे. या सिनेमाचा काही भाग मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये शूट झाला. त्याचे शॉट ट्रेलरमध्ये सुंदररित्या दाखवण्यात आले आहेत. या सिनेमाचे शूटिंग ऑक्टोबर 2015मध्ये झाले होते. त्यावेळी सिनेमाच्या शूटिंगवर बराच वाद झाला होता.
काय वाद झाला होता?
- हृतिक रोशनच्या 'मोहेंजोदारो' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.
- जबलपूरच्या भेडाघाटमध्ये नर्मदा नदीत हृतिक रोशनने, डमी मगरीसोबत फाइट सीन्स चित्रीत केले होते.
- शूटिंगसाठी ज्या आर्टिफिशिअर मगरी बनवण्यात आल्या होत्या, त्यांच्या केमिकलमुळे नर्मदा प्रदूषित होत असल्याचा आरोप लावला होता.
- इतकेच नव्हे तर फाइट सीनमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचासुध्दा आरोप लावला होता.
- नर्मदा मगरीची स्वारी करते. परंतु सिनेमासाठी मगरीला मारल्याचा सीन शूट करण्यात आला.
या सीन्सच्या शूटिंगसाठी भेडाघाट सर्वांत सुंदर लोकेशन...
- सिनेमाचा दिग्दर्शक गोवारिकरने या सीन्सच्या शूटिंगसाठी भेडाघाट सर्वात चांगले आणि सुंदर लोकेशन असल्याचे सांगितले होते. परंतु बर्गीच्या आमदार प्रतिमा सिंह यांचा मुलगा वकील वैभव सिंहने यावर प्रश्न उपस्थित केले होते.
- वकील वैभव सिंहने फाइन सीनमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावला होता. त्यांनी तर्क लावला होता, की नर्मदा नदी मगरीची स्वारी करते, परंतु येथे शूटिंगदरम्यान मगरीला मारताना दाखवले.
- 'मोहेंजोदारो'चा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरने सिनेमाच्या एका महत्वाच्या सीनसाठी 28 ऑक्टोबरला जबलपूरच्या भेडाघाटला आला होता.
- त्याच्यासोबत मुख्य अभिनेता हृतिक रोशन आणि 200 क्रू मेंबर्स होते.
- 'मोहेंजोदारो'पूर्वी भेडाघाटमध्ये 'अशोका', 'बॉबी', 'गंगा की सौगंध'सह अनेक सिनेमांचे शूटिंग झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून भेडाघाटवर शूट झालेले ओरिजनल आणि ट्रेलरमधील PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...