आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मदर इंडिया\' ते \'मातृ\'पर्यंत, असा आहे बॉलिवूडच्या \'माँ\' चा प्रवास..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बेटा, मैने तेरे लिए गाजर का हलवा बनाया है', साठ आणि सत्तरच्या दशकातील चित्रपटांत  भूमिका करणाऱ्या प्रत्येक हिरोच्या आईचे हे ब्रीदवाक्यच होते. जेव्हाही चित्रपटातील हिरो चांगल्या मार्कांनी पास व्हायचा तेव्हा आईचे प्रेम व्यक्त करणारा हा डायलॉग होता.
 
असे अनेक चित्रपट आहेत ज्यातील आईच्या भूमिकेमुळे त्या चित्रपटांची प्रतिष्ठाही वाढली होती. हिंदी चित्रपटात सर्वात आदर्श आईची भूमिका मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केल्या 'मदर इंडिया' चित्रपटात नर्गिसने निभावली होती. पती राजकुमार यांच्या निधनानंतर आपल्या दोन मुलांना (राजेंद्र कुमार), (सुनील दत्त) ती वाढवते. एकीकडे राजेंद्र कुमार एकदम साध्या-सरळ स्वभावाचा असतो तर, सुनील दत्त मुलींना छेडण्यात तरबेज असतो. यातील नर्गिसला आपल्या मुलाने आपल्याच गावातील मुलीवर हात टाकलेला आवडत नाही आणि ती सरळ त्याच्यावर निशाना साधत त्याला मृत्यूशय्येवर पोहचवते. त्या काळात अशाप्रकारच्या आईचे पडद्यावर सादरीकरण फार मोठी गोष्ट होती. अभिनेत्री नर्गिस यांच्या जबरदस्त अभिनयाने हा चित्रपट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा,  बॉलिवूडमधील आईची भूमिका पार पाडणाऱ्या इतर अभिनेत्री..
बातम्या आणखी आहेत...