मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या आयुष्यावर आधारित 'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला स्कायलाइनसोबत बॅकग्राउंडला श्रद्धा कपूर अर्थात हसीनाचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते, मोहम्मद अली रोड का लफड़ा सुलझाने के लिए दुबई से कॉल आएगा तुम्हें, चलेगा!... या डायलॉगमध्ये हसीनाच्या भूमिकेत श्रद्धाचा आवाज शोभत नाही. सिनेमातील काही संवाद चांगले जमले आहेत. पण श्रद्धाचा आवाज आणि डायलॉग डिलिव्हरीचा मेळ जमलेला दिसत नाही. यात श्रद्धाचा सख्खा भाऊ सिद्धांत कपूरने दाऊद इब्राहिमची भूमिका वठवली आहे.
एका बहिणीपासून सुरु झालेल्या हसीनाचा प्रवास ‘गॉडमदर’ आणि ‘गँगस्टर’पर्यंत येऊन कधी थांबला याचं चित्रण ‘हसीना…’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. जुलै 2014मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने हसीना पारकरचे निधन झाले होते. दिग्दर्शक अपूर्व लाखिया आणि निर्माते नाहिद खान यांचा हा सिनेमा येत्या येत्या 18 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्व, गँगवॉर आणि एका वेगळ्या मुंबईची झलक पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.
पुढे बघा, 'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई'च्या ट्रेलरचे फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर ट्रेलर...