आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई फिल्म सिटीतील अडीच लाख कामगार-कलाकार संपावर, अशा आहेत मागण्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फिल्म सिटीतील जवळपास 250,000 कामगारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. १५ ऑगस्टपासून हा संप सुरु झाला असून त्या टीव्ही कलाकारांचाही समावेश आहे. अनेक निर्मात्यांसोबत असलेल्या वादांचा लवकरात लवकर निर्णय लागावा तसेच इतर सुविधा मिळाव्या असा या संपाचा मुख्य उद्देश आहे. 
 
फेडरेशन ऑफ वेस्ट इंडिया सिने इम्पलॉईजचे अध्यक्ष बिरेंद्र नाथ तिवारी यांनी सांगितले की, "सिनेसृष्टीतील कलाकार, कामगारांना ठरवलेल्या 8 तासांहूनही जास्त वेळा काम करावे लागते. यावेळी त्यांच्या सुरक्षेचा आणि मिळणाऱ्या पगाराचा कोणत्याच प्रकारे विचार केला जात नाही". अनेक कामगार, कलाकारांचा यात समावेश आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आणि सुरक्षितता या मुख्य वादांना यानिमित्ताने सिनेसृष्टीतील कलाकार आणि कामगार वाचा फोडणार आहेत. यावेळी त्यांनी रस्त्यावर निदर्शनेही केली आहेत. 
 
2015 साली याच मागण्या जेव्हा निर्मात्यांकडे करण्यात आल्या होत्या तेव्हा त्यांनी कामगारांना त्यांच्या पगारात पहिल्या वरषी 13 टक्क्यांनी वाढ मिळेल असे सांगण्यात आले होते जे अजूनही झाले नाही. कामगारांना गुलामाप्रमाणे होणारी वागणुक थांबवण्यात यावी, ही या संपावर गेलेल्या कामगारांची मुख्य मागणी आहे. 
 
सध्या फिल्म सिटीत शाहरुख खानचा आगामी चित्रपट, संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती आणि अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती 9चे शूटिंग सुरु आहे. या संपामुळे या तिन्ही मोठ्या प्रोजेक्टसवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, संपावेळी रस्त्यावर निदर्शने करणारे कामगार..
बातम्या आणखी आहेत...