आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run Case : Salman Khan Files Affidavit In SC, Says He Wasn't Driving The Car

सलमानचे पोलिसांवर गंभीर आरोप, म्‍हटले - मला खोट्या केसमध्‍ये फसवत आहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - 'हिट अँड रन'प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या निर्दोष सुटकेविरोधात महाराष्‍ट्र सरकारने सर्वोच्‍च न्‍यालयात दाद मागितली. त्‍यानंतर सलमानने एक शपथपत्र सादर केले असून, यात पोलिस आपल्‍याला फसवत असल्‍याचा आरोप केला आहे. शिवाय घटनेच्‍या वेळी आपण नशेत नव्‍हतो, असेही सलमानने यात म्‍हटले आहे.
काय आहे प्रकरण?
> गेली 13 वर्षे सुरू असलेल्या 'हिट अॅण्ड रन' प्रकरणी मुंबई हायकोर्टने सलमान खानची निर्दोष सुटका केली.
> सलमान खानच्या हिट अॅण्ड रनप्रकरणाचा तपास नीट न झाल्याचा ठपका न्यायमूर्ती अनिल रामचंद्र जोशी यांनी निकालपत्रात ठेवला होता. त्यांची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली. अशा प्रकरणात तपास नीट न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते, याची माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने राज्य शासनाला दिले होते.
> सलमानचा तपास नीट न करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे प्रकरण चांगलेच भोवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बेकरीत घुसली होती कार ?
> 28 सप्टेंबर, 2002 च्या रात्री पार्टी करून घरी परतणार्‍या सलमान खानची लँड क्रूझर कार बेकरीत घुसली होती.
> सलमानने दुसर्‍या दिवशी सकाळी स्वत: आत्मसमर्पण केले होते. पोलिसांनी त्याला तत्काळ जामीन दिला होता.
> ऑक्टोबर 2002 मध्ये सलमानवर भादंवि कलम 302-II गुन्हा नोंदवण्यात आला.
> घटनेत नुरुल्ला शरीफ याचा मृत्यू झाला होता तर अब्दुल शेख, मुस्लिम शेख, मुन्नू खान व मुहम्‍मद कलीम जखमी झाले होते. सर्वजण बेकरीबाहेरच्या फुटपाथवर झोपले होते.
> सलमानला या प्रकरणी सेशंस कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यावर मुंबई हायकोर्टाने स्थगिती आणली होती.
पुढील स्लाइडवर वाचा, ज्या पुराव्यांनी शिक्षा झाली होती त्याच पुराव्या अभावी निर्दोष सुटला सलमान...