आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अटक झालेल्या या अॅक्ट्रेसच्या बाथरुममध्ये सापडले सोन्याचे नळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('मद्रास कॅफे' या सिनेमातील अभिनेत्री लीना पॉल)
मुंबई : 10 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी अटकेत असलेली 'मद्रास कॅफे' या सिनेमातील अभिनेत्री लीना पॉलच्या फ्लॅटमधील बाथरुममध्ये सोन्याचा मुलामा असलेले नळ सापडले आहे. फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह-इन-पार्टनर शेखर चंद्रशेखर यांना गेल्या महिन्यात ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनना लीना पॉलच्या गोरेगावमधील फ्लॅटची झाडाझडती केली. लीना पॉल गोरेगावमधील 3 हजार स्केवर फूटच्या फ्लॅटमध्ये राहत होती. या फ्लॅटचं महिन्याचं भाडं तब्बल 75 हजार रुपये आहे.
झाडाझडतीत काय मिळाले बंगल्यातून...
एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, या अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये 78 हँड बॅग, 8 जॅकेट, 37 सनग्लासेस, 43 ट्राऊजर्स आणि चपलांचे 40 जोड सापडले. शिवाय ब्रँडेड कंपनीचे 35 परफ्यूमच्या बॉटल्सही लीना पॉलच्या फ्लॅटमधून जप्त करण्यात आल्या आहेत. या परफ्यूम बॉटल्सच्या किंमती लाखाच्या घरात आहेत.शेखर चंद्रशेखरच्या रुममध्ये 42 जीन्स, 200 टी शर्ट्स, 73 शर्ट्स आणि चपलांचे 80 जोड सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय होते प्रकरण...
अभिनेता जॉन अब्राहमसोबत सिल्व्हर स्क्रिनवर झळकलेली अभिनेत्री लीना आणि तिचा लिव्ह इन पार्टनर चंद्रशेखर यांच्यावर बनावट गुंतवणूक कंपनी काढून तब्बल 10 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड सिनेसृष्टीत अनेक चित्रपट केल्यानंतर लीना पॉलने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. जॉन अब्राहमसोबत ती 'मद्रास कॅफे'मध्ये झळकली होती. लीना आणि शेखरने चिट फंडच्या धर्तीवर एक बनावट गुंतवणूक कंपनी थाटली. अत्यंत कमी दिवसांत, गुंतवलेल्या रकमेच्या दहा पट रक्कम देण्याची 'गॅरेंटी' दिली. त्यांच्या या फसव्या घोषणेला साधे-भोळे गुंतवणूकदार भुलले. त्यांनी गुंतवलेल्या रकमेची पावती त्यांना मिळाली खरी, पण ती घेऊन ते जेव्हा दहापट रक्कम घ्यायला गेले, तेव्हा लीना-शेखर वाट्टेल ती कारणे देऊ लागले. त्यांची ही लबाडी लक्षात आल्यावर काही मंडळींनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर, त्यांचे बिंग फुटले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या बातमीशी संबंधित छायाचित्रे...