आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mumbai Police Registers Case Against Kapil Sharma And Irfan Khan For Illegal Extension

अवैध बांधकाम : ट्विट अंगलट; कपिल शर्माचा शो बंद होणार, सोनी टीव्ही काडीमोड घेणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छोट्या पडद्यावर विनोदी कार्यक्रम सादर करून लोकप्रियता मिळवणाऱ्या कपिल शर्माचा सोनीवरील ‘कपिल शर्मा शो’ बंद केला जाणार असल्याची माहिती सोनी टीव्हीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. दिवाळीनंतर वा जानेवारीपासून कपिल शर्मा शो बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे कपिलने मनपा अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचा आरोप केल्याने त्याचा शो बंद केला जाणार असल्याचेही चित्रपटसृष्टीत बोलले जात आहे. एकूणच कपिल शर्माला ट्विट प्रकरण चांगलेच भोवणार असे दिसून येत आहे.

कलर्स वाहिनीवर कपिलचा शो सुरू होता. त्याला चांगला टीआरपीही मिळाल्याने कपिलने कलर्सवाल्यांकडे पैसे वाढवून मागितले. परंतु त्यांनी नकार दिल्यानंतर कपिलने सोनी टीव्हीशी संधान बांधले. सोनीने शोची लोकप्रियता पाहून त्याला चांगली रक्कम देऊन आपल्याकडे बोलावले. मात्र कलर्सच्या कॉमेडी नाइट लाइव्हचा टीआरपी ८८८९ तर कपिलच्या शोचा टीआरपी ५३९० च राहिल्याने सोनीवाले नाराज होते. ३४ व्या आठवड्यात म्हणजेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात टीआरपी ८३१३ वर गेला; परंतु तो ३३ व्या आठवड्यापेक्षा ४०० ने कमी झाला होता. याच दरम्यान कॉमेडी नाइटचा टीआरपी मात्र ९००० च्या वर गेला.
टीआरपी सुधारेल अशी अपेक्षा होती; परंतु टीआरपी घसरतच चालल्याचे दिसून आले. प्रयत्न करूनही टीआरपी वाढत नसल्याने सोनीचे अधिकारी नाराज असल्याची माहिती देऊन सूत्रांनी सांगितले, टीआरपी नसल्याने कपिल शर्मा शो बंद करण्याचा निर्णय सोनी घेणार आहे. त्यातच आता त्याच्या ट्विटने चांगलीच उलथापालथ केल्यानेही सोनी कपिलशी नाते तोडण्याचा विचार करीत आहे, असेही म्हटले जात आहे. ऑफिस बांधकामाच्या परवानगीसाठी अधिकारी लाच मागत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करून कपिल शर्माने चांगलाच वाद निर्माण केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच ट्विटला उत्तर देत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुंबई महानगरपालिकेच्या दक्षता विभागानेही तत्परता दाखवत पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यानंतर कपिल शर्माच्या अनधिकृत बांधकामांची यादीच जाहीर करण्यात आली. केवळ ऑफिसच नव्हे तर गोरेगाव येथील घरातही त्याने अनधिकृतरित्या बदल केल्याचे उघडकीस आले. त्याच्या या ट्विटमुळे चित्रपट जगतातील अनेकांच्या अनधिकृत बांधकामांवर आता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. म्हाडा कॉलनीत अनेक कलाकारांनी अनधिकृतरित्या बांधकाम केलेले आहे. इरफान खाननेही अनधिकृत बांधकाम केले असल्याने त्यालाही महापालिकेने नोटीस बजावली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, हिमेश रेशमियासह ५० सेलिब्रिटी गोत्यात... कपिल - इरफानवर FIR, आरोप सिद्ध झाले तर 3 वर्षांपर्यंत होऊ शकते कैद
बातम्या आणखी आहेत...