आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहे हा 'मुन्नाभाई एमबीबीएस' अॅक्टर, रेपच्या आरोपात आहे आरोपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात लहान भूमिकेत दिसलेला अभिनेता विशाल ठककर गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहे. आज तो कुठे आहे याचे उत्तर त्याच्या आईवडिलांकडेही नाही. त्याची आई दुर्गा ठककर रोज तो परत येण्याची वाट पाहते आहे. आई म्हणते. एक दिवस येईल परत..
 
आमच्या प्रतिनीधीशी बोलताना विशालच्या आईने सांगितले की, "रोज मी याच आशेत उठते की माझा मुलगा परत येईल. आता पूर्ण दोन वर्ष होतील जेव्हापासून माझा मुलगा बेपत्ता आहे. पोलिसांकडेही विशालची कोणतीच माहिती नाही. पण मी अजून आशा सोडलेली नाही. मला खात्री आहे माझा मुलगा परत येईल.."
बेपत्ता होण्याअगोदर लागला होता रेपचा आरोप..
- विशाल बेपत्ता होण्याअगोदर त्याच्यावर 25 वर्षीय मुलीने रेप, धोका देणे आणि मारहाण करणे असा आरोप लावला होता. त्याच्यावर चारकोप पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल केली होती. तक्रारीत मुलीने सांगितले की विशालने तिच्यासोबत लग्नाचे वचन दिले होते. पण फिजीकल रिलेशन बनवल्यानंतर त्याने तिच्याशी लग्नास नकार दिला. 
 
- या प्रकरणात विशालच्या आईने सांगितले की, "माझ्या मुलावर लागलेले सर्व आरोप खोटे आहेत. ज्या मुलीने त्याच्यावर आरोप केले ती अनेकदा आमच्या घरीही आली आहे. विशालला तिच्याशी लग्न करायचे होते पण त्याला कळाले की ती मुलगी दुसऱ्या मुलांसोबत मिळून त्याला फसवत आहे तेव्हा त्याने तिच्याशी संबंध तोडले." 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, डिप्रेशनमध्ये गेला होता विशाल..
बातम्या आणखी आहेत...