आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मुन्नी\'च्या \'अम्मी\'चे या अभिनेत्यासोबत झालेय लग्न, स्वत: पतीने उलगडले रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती मानव विज आणि हर्षाली मल्होत्रासोबत मेहर विज - Divya Marathi
पती मानव विज आणि हर्षाली मल्होत्रासोबत मेहर विज
मुंबई: 'बजरंगी भाईजान' सिनेमातील मुन्नी अर्थातच हर्षाली मल्होत्राच्या अम्मीची (आई) भूमिका साकारणारी मेहर विज विवाहित आहे. रविवारी फ्रेंडशिप डेनिमित्त तिचा पती मानव विजने हे सीक्रेट सोशल मीडियावर उघड केले. त्याने एक फोटो शेअर करून लिहिले, 'होय, 5 जुलै 2009ला मी या सुंदर बॉम्बसोबत लग्न केले आणि त्यानंतर ती माझी बेस्ट फ्रेंड झाली. हॅप्पी फ्रेंडशिप डे स्वीटहार्ट.'
मेहरचे खरे नाव आहे वैशाली सचदेव...
क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की 22 सप्टेंबर 1986ला नवी दिल्लीमध्ये जन्मलेल्या मेहरचे खरे नाव वैशाली सचदेव आहे. मानवसोबत लग्न केल्यानंतर तिने तिचे नाव मेहर ठेवले. वैशालीने 'बजरंगी भाईजान'शिवाय 'लकी : नो टाइम फॉर लव' आणि 'दिल विल प्यार व्यार' सिनेमांत काम केले आहे. ती 'किस देश मे है मेरा दिल' आणि 'राम मिलाई जोडी' या मालिकांमध्येसुद्धा झळकली आहे.
कोण आहे मानव विज...
मानव अभिनेता आहे, विशेष म्हणजे पंजाबी सिनेमांत काम करतो. त्याने पंजाबमध्ये 'पंजाब 1984', 'मिनी पंजाब', आणि 'मम्मी पंजाबी' सिनेमांत काम केले आहे. टीव्हीवर 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'मितवा फूल कमल के' आणि 'किस देश में है मेरा दिल' मालिकांमध्येसुद्धा दिसला आहे. मानवने 1993मध्ये रिलीज झालेल्या 'आंखे' या बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. अभिनेता होण्यापूर्वी मानव डॉक्टर होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मानव आणि मेहरचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...