आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशा भोसलेंना पुत्रशोक, संगीतकार हेमंत भोसले यांचे कॅन्सरने निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गायिका आशा भोसलंचे संगीत दिग्दर्शक पुत्र हेमंत (६६) यांचे रविवारी रात्री स्कॉटलंडमध्ये निधन झाले. ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांनी 15 हिंदी आणि काही मराठी चित्रपटांनाही संगीत दिले होते.
हेमंत यांच्या निधनानेमुळे लता मंगेशकरांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द झाले. गानसम्रादायी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनीच हेमंत भोसले यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. एक संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी छाप निर्माण केली होती. 'फिर तेरी याद', 'सनसनी खेज कोई बात', 'तेरी मेरी कहानी', 'आया रंगीला सावन', 'अब कहाँ जायेंगे हम' ही त्यानी संगीत दिलेली गाणी बरीच गाजली. सोबतच, 'शारद सुंदर चंदेरी राती', 'बाळा माझ्या नीज ना', 'मी ही अशी भोळी कशी गं', 'जा जा जा रे नको बोलू' ही त्यांची मराठीतील गाजलेली गाणी आहेत.
आशा भोसले या सध्या सिंगापुर येथे होत्या, आशाताईंचा मुलगा आनंद भोसले यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी आशाताईंची मुलगी वर्षा भोसले यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.
हेमंत भोसले यांना एक मुलगी असून ती इंग्लंडमध्ये शिकत आहे. ते घटस्फोटीत होते.